Delhi Car Blast: स्फोट घडताना उमर कारमध्येच होता, DNA चाचणीत मोठा खुलासा, स्वत:ला का उडवलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Delhi Red Fort Car Blast: दिल्ली कार स्फोट प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. सोमवारी संध्याकाळी चांदणी चौकातील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात दहशतवादी डॉ. उमर उपस्थित होता.
Delhi Car Blast Case: दिल्ली कार स्फोट प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. सोमवारी संध्याकाळी चांदणी चौकातील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात दहशतवादी डॉ. उमर उपस्थित होता. त्याने गाडीतच स्वतःला उडवून दिल्याची पुष्टी डीएनए चाचणीतून समोर आली आहे. त्यामुळे उमरने जाणूनबुजून बॉम्बस्फोट घडवून आणल्याचं तपासातून समोर आलं आहे. सोमवारी उमरने लाल किल्ल्यावरील मेट्रो गेट क्रमांक १ जवळ कारमध्ये स्फोट घडवून आणला. या दहशतवादी हल्ल्यात उमरसह बारा जणांचा मृत्यू झाला.
खरं तर, लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारच्या स्फोटात उमरचा मृत्यू झाला की नाही? याबद्दल बराच संशय होता. त्याच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी पोलीस आणि एजन्सींनी डीएनए चाचणी केली. त्याच्या आईला पुलवामामध्ये ताब्यात घेण्यात आले. उमरच्या आईचा डीएनए नमुना घेण्यात आला आणि त्याची लाल किल्ल्याजवळ सापडलेल्या अवशेषांशी तुलना करण्यात आली. यावेळी उमरच्या आईची आणि लाल किल्ल्याजवळील अवशेषांची डीएनए चाचणी मॅच झाली. त्यामुळे उमरने त्या स्फोटात स्वतःला उडवून दिलं, हे स्पष्ट झालं आहे.
advertisement
दहशतवादी उमर का घाबरला होता?
सूत्रांकडून माहितीनुसार, दहशतवादी उमरला पोलिसांच्या हाती लागण्याची भीती होती. सोमवारी सकाळी फरिदाबादमध्ये स्फोटके सापडली आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. डॉक्टर उमर कसाबसा तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पण पोलीस त्यालाही लवकरच पकडतील अशी भीती त्याला होती. त्यामुळे त्याने घाईघाईत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्याचा प्लॅन आखला. त्याच्याकडे आधीच काही स्फोटके होती. त्याने स्फोटकांनी भरलेली कार दिल्लीत विविध ठिकाणी फिरवली. तो मयूर विहार, फरिदाबाद आणि कॅनॉट प्लेसमध्ये दिसला. त्यानंतर त्याने लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये सुमारे तीन तास घालवले आणि बॉम्ब अधिक घातक कसा बनवायचा यावर विचार केला. अखेर, संध्याकाळी, तो घाबरला आणि लाल किल्ला मेट्रो गेट क्रमांक १ जवळ तो स्फोट केला.
advertisement
फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल नंतर स्फोट
खरं तर, फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला. हरियाणाच्या फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठातून २,९०० किलोग्रॅमपेक्षा जास्त स्फोटके आणि दारूगोळा जप्त झाल्यानंतर काही तासांतच दहशतवादी उमरने सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये स्फोट केला. या स्फोटात बारा लोक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 13, 2025 6:55 AM IST
मराठी बातम्या/देश/
Delhi Car Blast: स्फोट घडताना उमर कारमध्येच होता, DNA चाचणीत मोठा खुलासा, स्वत:ला का उडवलं?


