Delhi Blast : 1 गाडीत स्फोट, 12-15 कारना आग... लाल किल्ला परिसरातील भीषण घटनेचे Video
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मुंबई : नवी दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ला (Red Fort) परिसरात रविवारी संध्याकाळी एक अचानक स्फोट झाला. माहितीप्रमाणे, मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक 1 जवळ उभी असलेल्या कारमध्ये सुमारे सायंकाळी 6:45 वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर त्या कारसोबत आणखी दोन वाहनांना आग लागली असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. हा स्फोट दिड किलोमीटर लांबपर्यंत ऐकायला आला. त्यामुळे या स्फोटाची भीषणता किती होती याचा अंदाजा आपण लावू शकतो.
व्हिडीओ पाहा
दिल्ली में लाल किले के पास खड़ी कार में ब्लास्ट, धमाके के बाद 3 गाड़ियों में आग लग गई।
कई लोगों के घायल होने की खबर है।
#Delhi #Delhipolice #lalqila #blast #car pic.twitter.com/XNoJQSD7Vx
— Vinay Saxena (@vinaysaxenaj) November 10, 2025
advertisement
लाल किल्ला परिसर हा दिल्लीतील सर्वाधिक गर्दीचा आणि सुरक्षा व्यवस्थेने भरलेला भाग आहे. त्यामुळे या स्फोटानंतर लगेचच पोलिसांनी परिसर सील केला आहे.
बम निष्क्रिय पथक (Bomb Squad) आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत.
व्हिडीओ पाहा
देश की राजधानी दिल्ली में लाल किले के सामने कार में धमाका, जिसके बाद 3 गाड़ियों में भी आग लग गई.
दमकल विभाग का कहना है कि उन्हें कार में धमाके की कॉल मिली है!!लालकिला मेट्रो स्टेशन गेट नंबर 1 के पास एक कार में धमाका हुआ है.#Delhi #blast pic.twitter.com/5jUuSBFZid
— Shivam Pratap Singh (@journalistspsc) November 10, 2025
advertisement
वाहतुकीसाठी गेट क्रमांक 1 च्या आसपासचा भाग बंद करण्यात आला असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे.
मेट्रो स्टेशन आणि आसपासच्या भागातील सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.
स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट
दिल्ली में लाल किले के पास कार में ब्लास्ट के बाद एक और वीडियो-
एक कार में ब्लास्ट के बाद कई गाड़ीयां जलीं, कई लोगों के घायल होने की खबर है।
मौके पर फॉरेंसिक की टीम पहुंच गई है। #Delhi #Lalquila #Blast #DelhiBlast #Delhicarblast pic.twitter.com/lHXJbv8W4Z
— Vinay Saxena (@vinaysaxenaj) November 10, 2025
advertisement
सध्या पोलिस आणि फॉरेन्सिक टीमकडून स्फोटाचे कारण आणि वापरलेलं साहित्य याची तपासणी सुरू आहे.
कार मालकाची ओळख आणि परवानगी तपासली जात आहे. आतापर्यंत एक मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. पण जखमी किंवा मृत्यूच्या संख्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही, मात्र पोलिसांनी सांगितलं की तपास सुरू आहे आणि अधिकृत माहिती नंतर दिली जाईल.
advertisement
नागरिकांसाठी सूचना
🚨 BREAKING
Lal Qila, Delhi: An explosion took place today at around 6:50 PM. Multiple cars parked on the main road (unauthorised parking) caught fire, and people were seen running to safety.
metro entry gate glass were also shattered .
Cause of the blast is not confirmed yet. pic.twitter.com/cbQpBPdjhH
— Public Views India 🇮🇳 (@PublicViews3) November 10, 2025
advertisement
पोलिसांनी नागरिकांना लाल किल्ला आणि जवळच्या मेट्रो स्थानकांपासून सध्या दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
कोणतीही संशयास्पद वस्तू, हालचाल किंवा गर्दी दिसल्यास तात्काळ 112 वर किंवा जवळच्या सुरक्षाकर्मीला कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या घटनेनंतर राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पोलिसांकडून पुढील माहिती लवकरच दिली जाणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 7:41 PM IST
मराठी बातम्या/देश/
Delhi Blast : 1 गाडीत स्फोट, 12-15 कारना आग... लाल किल्ला परिसरातील भीषण घटनेचे Video


