प्रेम धोका अन् हत्या! क्राइम सीरिज पाहून रचला डाव, लिव्ह इन पार्टनरने UPSC करणाऱ्या बॉयफ्रेंडला संपवलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अमृताने असं का केलं? त्या 39 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं, पोलिसांना कसा लागला हत्येचा सुगावा? कोणत्या पुराव्याने पकडली गेली अमृता? लिव्हइनमध्ये राहणाऱ्या पार्टनरच्या मर्डर मिस्ट्रीची वाचा संपूर्ण Inside Story
दिल्लीच्या तिमारपूर परिसरातील गांधी विहार, ई-६० नंबरचा तो शांत फ्लॅट. ६ ऑक्टोबरच्या रात्री याच घरात आगीच्या ज्वालांनी एका तरुणाचा जीव घेतला. रात्रीच्या अंधारात लागलेली आग इतकी भयंकर होती की, परिसरातील नागरिक घाबरून रस्त्यावर धावत आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवली, पण जेव्हा त्या जळालेल्या खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा आत फक्त एक जळालेला मृतदेह होता.
मृतदेहाची ओळख रामकेश मीणा (वय ३२) अशी झाली, जो याच फ्लॅटमध्ये राहत होता. यूपीएससीची तयारी करत होता अशी माहिती समोर आली. सुरुवातीला, हा एक अपघात असल्याचं वाटलं. शॉर्ट सर्किटमुळे किंवा गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे हे घडलं असावं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. पण काही तासांतच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांना जाणवले की, या आगीत केवळ लाकडी वस्तू आणि भिंतीच जळाल्या नव्हत्या, तर त्यामागे एक भयंकर सुनियोजित कट दडलेला होता. त्यानंतर, तातडीने फॉरेंसिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं.
advertisement
जळलेल्या खोलीचा सर्वात मोठा 'कोडं'
पोलीस आणि फॉरेंसिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा करायला सुरुवात केली. खोली पूर्णपणे जळून खाक झाली होती, पण त्या राखेतही काही महत्त्वाचे पुरावे पूर्ण जळून खाक झाले नव्हते. जे पोलिसांच्या हाती लागले, त्यानंतर हा अपघात नसून घातपातच आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्या दिशेनं तपास सुरू झाला. या तपासादरम्यान, एक गोष्ट अत्यंत आणखी कोड्यात टाकणारी होती.
advertisement
ज्या खोलीत रामकेशचा मृतदेह आढळला होता, त्या खोलीची बाहेरील लोखंडी जाळी आतून बंद होती. याचा अर्थ, असा की खोली आतून लॉक होती आणि रामकेश बाहेरून निघू शकला नाही. त्यामुळे, सुरुवातीला पोलिसांना हा आत्महत्येचा प्रकार वाटला. पण, फॉरेंसिक टीमने बारकाईने तपासणी केली, तेव्हा सत्य काहीतरी वेगळेच असल्याचं समोर आलं. ग्रिलची जाळी थोडीशी वाकलेली होती, जणू कोणीतरी बाहेरून हात घालून ती जाणीवपूर्वक आतून बंद केली असावी! हाच तो 'खूनी ट्रॅप' होता, ज्यामुळे पोलीस काही काळ गोंधळात पडले आणि हीच 'फॉरेंसिक किलर'ची पहिली मोठी चाल होती.
advertisement
CCTV ने उलगडलं ३९ मिनिटांचं गूढ
हत्या हे तर आता निश्चितच झालं. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्याच CCTV मध्ये हैरान करणारे सत्य समोर आलं. फुटेजमध्ये स्पष्ट दिसले की, आग लागण्यापूर्वी एक मुलगा आणि एक मुलगी आपला चेहरा कपड्याने झाकून त्या फ्लॅटमध्ये शिरले होते. बरोबर ३९ मिनिटांनंतर, म्हणजेच रात्री २ वाजून ५७ मिनिटांनी, ते दोघेही तिथून घाईघाईत बाहेर पडले. त्या दोघांनी फ्लॅट सोडल्यानंतर काही मिनिटांतच आग लागल्याचं CCTV मध्ये स्पष्ट दिसलं. आता पोलिसांना खात्री पटली होती की, ही घटना अपघात नसून नियोजित हत्या आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी त्या मुलीची ओळख पटवली.
advertisement
फॉरेंसिक स्टुडंट 'अमृता' पोलिसांच्या जाळ्यात
सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या मुलीचे नाव अमृता चौहान आहे. मुरादाबादची रहिवासी असलेली ही मुलगी फॉरेंसिक सायन्समध्ये बी.एस.सी.चे शिक्षण घेत होती. तिच्यासोबत असलेला मुलगा सुमित कश्यप (वय २७) हा तिचा 'एक्स बॉयफ्रेंड' होता. दोघांचे मोबाईल स्विच ऑफ होते, पण त्यांची शेवटची लोकेशन ई-६० फ्लॅटच्या आसपासचं मिळालं. १२ दिवसांच्या अथक तपासानंतर, १८ ऑक्टोबरला पोलीस अमृता चौहानच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी झाले.
advertisement
प्रायव्हेट फोटोंमधून ब्लॅकमेलिंग
दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा कबुल करण्यासाठी तयार नव्हते. मात्र पोलिसांचा खाक्या पडला आणि अमृताने पोपटासारखं सगळं घडाघडा सांगून टाकलं. आपणच हत्या केल्याचं अखेर तिने कबूल केलं. तिने जे सांगितलं ते एका क्राइम सिनेमापेक्षा कमी नव्हतं. इतक्या भयानक प्रसंगातून ती गेली आणि त्यानंतर ती चीड तिच्या डोक्यात बसली. अमृताने सांगितलं की ब्रेकअपनंतर ती रामकेशसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याच काळात रामकेशने अमृताचे काही खाजगी फोटो आपल्या मोबाईल आणि हार्ड डिस्कमध्ये सेव्ह करून ठेवले. जेव्हा त्यांचे नाते तुटले, तेव्हा रामकेशने याच फोटोंच्या आधारावर अमृताला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
advertisement
रामकेश तिला ब्लॅकमेल करायचा, तिने हे सगळं सहन न झाल्याने अखेर आपल्या एक्स-बॉयफ्रेंड सुमितला सांगितले. रागात आणि सूडाच्या भावनेने पेटलेल्या अमृताने सुमितशी संपर्क साधला. सुमितने 'मी सर्व काही ठीक करेन' असं आश्वासन दिलं आणि दोघांनी मिळून रामकेशला कायमचा संपवण्याचा कट रचला.
तिघांनी मिळून गळा दाबला, नंतर तेल-तूप ओतून जाळले
५ ऑक्टोबरच्या रात्री अमृता, सुमित आणि त्यांचा तिसरा साथीदार संदीप कुमार रामकेशच्या खोलीत पोहोचले. सर्वप्रथम, त्या तिघांनी मिळून रामकेशचा गळा घोटला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेहावर घरात ठेवलेले सगळे तेल, तूप आणि दारू ओतली आणि आग लावली. आरोपी सुमित हा एलपीजी सिलेंडर सप्लायचे काम करत असल्याने त्याला सिलेंडरने आग पसरवण्याची पद्धत माहीत होती. त्याने सिलेंडरचा वॉल्व उघडा सोडला, जेणेकरून काही मिनिटांतच मोठा स्फोट होऊन ही घटना सिलेंडर स्फोटामुळे झालेला अपघात वाटेल.
ही आत्महत्या की अपघात वाटावा यासाठी अमृताने जाळी वाकवून आतून लॉक केली. ज्यामुळे पोलिसांना वाटेल की रामकेशने आतून खोलीला लॉक लावलं होतं आणि त्याच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. तिसरा आरोपी संदीप कुमार अजूनही सीसीटीव्हीमध्ये न दिसल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळं करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या काइम सीरिज पाहिल्या होत्या. त्यातून त्यांनी आयडिया घेतली आणि हत्येचा कट रचला होता.
अगदी सफाईदारपणे त्यांना हा प्लॅन रचला होता मात्र CCTV फुटेज आणि आतून जाळी वाकवून लावलेली कडी यामुळे तिघेही अडकले गेले. शेवटी म्हणतात ना की हत्या करणारा काहीतरी चूक करून जातो ती अशी, कितीही फुलप्रूफ प्लॅन केला असला तरी एका छोट्या चुकीमुळे तिघेही सापडले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
October 28, 2025 1:04 PM IST
मराठी बातम्या/देश/
प्रेम धोका अन् हत्या! क्राइम सीरिज पाहून रचला डाव, लिव्ह इन पार्टनरने UPSC करणाऱ्या बॉयफ्रेंडला संपवलं


