India Pakistan ceasefire : भारत-पाक तणावात Donald Trump 'बिन बुलाए मेहमान', म्हणतात 'काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी मी...'

Last Updated:

Donald Trump post On Kashmir solution : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना तणाव थांबवण्याची विनंती केली आणि क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला आहे.

News18
News18
Donald Trump on India-Pakistan ceasefire : ऑपरेशन सिंदूरने सुरू झालेला भारत-पाकिस्तान संघर्ष अखेर शनिवारी रात्री संपला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना तणाव थांबवण्याची विनंती केली आणि शस्त्रसंधी लागू करण्याचं आवाहन केल्याचा दावा केला होता. त्यानंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री आणि भारतीय परराष्ट्र सचिवांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली होती. दोन्ही देशांच्या लष्कराच्या संचालनाचे महानिर्देशकांमध्ये झालेल्या थेट चर्चेनंततरच शस्त्रसंधी झाल्याचे भारताने म्हटले आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump post On Kashmir solution) पुन्हा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्रम्प यांच्याकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा रविवारी ट्रुथवर पोस्ट करत पुन्हा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही दूरच्या शेजाऱ्यांसोबत व्यापार वाढवतील आणि काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्यासोबत काम करतील. अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
advertisement

Donald Trump यांची पोस्ट

भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि अटल शक्तिशाली नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे, कारण त्यांच्याकडे हे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची ताकद, शहाणपण आणि धैर्य आहे की सध्याच्या आक्रमकतेला थांबवण्याची वेळ आली आहे. ज्यामुळे इतक्या आणि इतक्या लोकांचा मृत्यू आणि विनाश होऊ शकला असता, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
advertisement
लाखो चांगले आणि निष्पाप लोक मरण पावले असते. तुमच्या धाडसी कृतींमुळे तुमचा वारसा खूप वाढला आहे. मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली. चर्चा झाली नसली तरी, मी या दोन्ही महान राष्ट्रांसोबत व्यापारात लक्षणीय वाढ करणार आहे, असंही ट्रम्प यावेळी म्हणाले.
advertisement
दरम्यान, या व्यतिरिक्त "हजारो वर्षांनंतर" काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी मी तुमच्या दोघांसोबत काम करेन. भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगल्या प्रकारे केलेल्या कामासाठी देव आशीर्वाद देवो, असं म्हणत ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला आहे.
मराठी बातम्या/देश/
India Pakistan ceasefire : भारत-पाक तणावात Donald Trump 'बिन बुलाए मेहमान', म्हणतात 'काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी मी...'
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement