Chandrayaan : पृथ्वीमुळे चंद्रावर तयार होतंय पाणी; पण कसं? Chandrayaan-1 च्या डेटामधून मोठा खुलासा
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
पृथ्वीमुळेच चंद्रावर पाणी तयार होत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. कारण येथून जाणारे उच्च उर्जेचे इलेक्ट्रॉन चंद्रावर पाणी तयार करण्यास मदत करत आहेत.
नवी दिल्ली 15 सप्टेंबर : चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध लावला होता, ही वस्तुस्थिती अनेक वर्षांपूर्वी उघड झाली. पण आता एक नवीन गोष्ट समोर येत आहे. पृथ्वीमुळेच चंद्रावर पाणी तयार होत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. कारण येथून जाणारे उच्च उर्जेचे इलेक्ट्रॉन चंद्रावर पाणी तयार करण्यास मदत करत आहेत.
अमेरिकेतील मनोवा येथील हवाई विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हा खुलासा केला आहे. पृथ्वीभोवती असलेल्या प्लाझ्माच्या शीटमुळे चंद्राचे दगड वितळतात किंवा तुटतात, असं या अभ्यासातून समोर आलं आहे. यामुळे खनिजे तयार होतात किंवा ते बाहेर येतात. याशिवाय चंद्राच्या पृष्ठभागाचे हवामान आणि वातावरणही बदलत असतं.
हा अभ्यास नुकताच नेचर अॅस्ट्रोनॉमी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे, की इलेक्ट्रॉन्समुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होत आहे. चंद्रावर कुठे आणि किती प्रमाणात पाणी आहे, हे पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना माहीत नाही. हे जाणून घेणंदेखील कठीण आहे. त्यामुळे चंद्रावर पाण्याच्या उत्पत्तीचं कारण कळू शकलेलं नाही.
advertisement
जर हे समजलं की तिथे पाणी कसं आणि कुठे मिळेल तिथे किंवा ते किती लवकर बनवता येईल. तर, भविष्यात तिथे मानवी वस्ती उभारण्यास मदत होईल. चांद्रयान-1 च्या एका उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे कण पाहिले होते. ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती.
चंद्र आणि पृथ्वी दोघेही सौर वाऱ्याच्या विळख्यात राहतात. सौर वाऱ्यामध्ये उच्च ऊर्जा कण असतात जसे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इ. ते चंद्राच्या पृष्ठभागावर वेगाने हल्ला करत राहतात. त्यांच्यामुळेच चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. चंद्रावरील बदलत्या हवामानामागील कारण म्हणजे जेव्हा सौर वारा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून जातो तेव्हा तो चंद्राचे संरक्षण करतो.
advertisement
परंतु सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश फोटॉनपासून चंद्राचे संरक्षण करणे पृथ्वीला शक्य नाही. सहाय्यक संशोधक शुई ली यांनी सांगितलं की, आम्हाला चंद्रावर एक नैसर्गिक प्रयोगशाळा सापडली आहे. आम्ही या प्रयोगशाळेतूनच त्याचा अभ्यास करतो. येथून आपण चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी तयार होण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करत आहोत. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या किंवा मॅग्नेटोटेलच्या बाहेर असतो तेव्हा सूर्याच्या उष्ण वाऱ्यांचा त्याच्यावर जास्त हल्ला होतो.
advertisement
जेव्हा ते मॅग्नेटोटेलच्या आत असतं तेव्हा त्यावर सौर वाऱ्यांचा क्वचितच हल्ला होतो. अशा स्थितीत पाणी तयार होण्याची प्रक्रिया थांबते. शुई ली आणि त्यांचे सहकारी चांद्रयान-1 च्या मून मिनेरॉलॉजी मॅपर उपकरणातील डेटाचे विश्लेषण करत होते. 2008 ते 2009 या कालावधीतील डेटाचे त्यांनी विश्लेषण केले आहे.
पृथ्वीच्या मॅग्नेटोटेलमुळे, चंद्रावर पाणी तयार होण्याची प्रक्रिया वेगवान किंवा मंद होते. याचा अर्थ चंद्रावर पाणी तयार होण्याच्या प्रक्रियेत मॅग्नेटोटेलचा थेट सहभाग नाही. पण त्याचा खोलवर परिणाम होतो. सौर वाऱ्यांमधून येणार्या उच्च उर्जेच्या प्रोटॉन-इलेक्ट्रॉनच्या प्रभावाप्रमाणे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2023 2:37 PM IST
मराठी बातम्या/देश/
Chandrayaan : पृथ्वीमुळे चंद्रावर तयार होतंय पाणी; पण कसं? Chandrayaan-1 च्या डेटामधून मोठा खुलासा