Air Indiaच्या पायलटने 2000 हजार लोकांचे प्राण वाचले, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक प्रसंग; विमान अक्षरशः आमच्या डोक्यावरून गेलं

Last Updated:

Air India Plane Crash:अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 चा थरारक अपघात मेघाणी नगर परिसरात झाला. सुमारे 230 प्रवाशांपैकी केवळ एक जण वाचला असून, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की पायलटने थोडक्यात हजारो लोकांचे प्राण वाचवले.

News18
News18
अहमदाबाद: येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 च्या दुर्घटनेची डोळ्यादेखत साक्ष दिलेल्या स्थानिक नागरिकाने सांगितले की- जर हे विमान निवासी भागावर कोसळले असते तर किमान 1,500 ते 2 हजार लोकांचा जीव जाऊ शकला असता. मात्र पायलटने प्रसंगावधान राखून विमान थोडेसे दूर नेत मोजके प्राण वाचवले.
लंडनकडे जाणारी AI-171 फ्लाइट दुपारी 1:38 वाजता अहमदाबादहून उड्डाण घेऊन निघाली होती. मात्र काही मिनिटांतच हे विमान मेघाणी नगर भागातील एका मेडिकल होस्टेलवर कोसळले.
एका प्रत्यक्षदर्शीने CNN-News18 ला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मैदानावर क्रिकेट खेळत होतो आणि तेव्हा हे विमान अक्षरशः आमच्या डोक्यावरून गेलं. खूपच खाली होतं. काही क्षणांत मोठा स्फोट झाला आणि धावपळ सुरू झाली. आम्ही धाव घेत घटनास्थळी पोहोचलो आणि सुमारे 15-20 लोकांना वाचवू शकलो. रोजचं विमान खूप वरून जातं, पण हे खूप जवळून गेलं. पायलटने जर घरांवर विमान कोसळवलं असतं, तर हजारो लोक मृत्युमुखी पडले असते.
advertisement
Air India Plane अपघातात राखेतून असे काही सुरक्षित सापडले की सर्वांचं नतमस्तक
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान जमिनीवर आदळण्याआधी जोरदार आवाज झाला आणि आकाशात मोठी आग दिसून आली. बोईंग 787 ड्रीमलाइनर हे विमान केवळ 825 फूट उंचीवर होते आणि झपाट्याने उंची गमावत जमिनीकडे कोसळले.
या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. त्यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होते. या भीषण अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. फक्त एकच प्रवासी- ४० वर्षीय विश्वास कुमार रमेश, जो ११A या एक्सिट रो सीटवर होता – गंभीर जखमी अवस्थेत बचावला.
advertisement
या दुर्घटनेत केवळ विमानातील प्रवासीच नव्हे तर जमिनीवर असलेल्या मेडिकल होस्टेलमध्येही अनेक जण मृत्युमुखी पडले.
मराठी बातम्या/देश/
Air Indiaच्या पायलटने 2000 हजार लोकांचे प्राण वाचले, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक प्रसंग; विमान अक्षरशः आमच्या डोक्यावरून गेलं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement