Air India Plane अपघातात चमत्कार, राखेतून असे काही सुरक्षित सापडले की सर्वांचं झाले नतमस्तक; विमानाचा लोखंडी वितळले, पण...

Last Updated:

Air Crash Miracle : अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला. सर्व काही जळून राख झाले. दरम्यान भगवद्‌गीता चमत्कारिकरित्या ढिगाऱ्यातून सापडली आहे. जी पूर्णपणे सुरक्षित आहे. भगवद्गीतेचे एकही पान जळालेले नाही. ते पूर्णपणे वाचता येते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

News18
News18
अहमदाबाद: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात आतापर्यंत 265 जणांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य रात्रीभर सुरूच राहिले. या दरम्यान घटनास्थळावरून 'भगवद्‌गीता'ची एक प्रत सापडली आहे. जी संपूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही बाब आश्चर्यजनक ठरत आहे कारण इतक्या भीषण आगीत सगळं काही जळून खाक झालं. विमानाच्या लोखंडी भागांपर्यंत वितळले, तरी राखेच्या ढिगाऱ्यात गीतेची एक प्रत अबाधित राहिली.
सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतं की भगवद्‌गीताचे कोणतेही पान जळालेले नाही. कोणताही कोपरा फाटलेला नाही. आजूबाजूचं सगळं काही नष्ट झालेलं असताना भगवद्‌गीता मात्र आगीपासून सुरक्षित राहिली.
व्हिडीओमध्ये कथितपणे अपघातग्रस्त विमानाचे घटनास्थळ दाखवण्यात आलं आहे. बचाव कार्यादरम्यान एक व्यक्ती भगवद्‌गीता हातात धरून दिसत आहे आणि तिची पाने उलटून दाखवत आहे. व्हिडीओ गुजराती भाषेत आहे आणि दावा करण्यात येतो आहे की गीता अपघातग्रस्त मलब्यातून सुरक्षित मिळाली.
advertisement
advertisement
घटनेबद्दल थोडक्यात माहिती
एअर इंडिया ची बोईंग 787 ड्रीमलाइनर फ्लाइट AI-171 ने गुरुवारी दुपारी 1:38 वाजता अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण घेतलं होतं. मात्र उड्डाण केल्यानंतर फक्त दोन मिनिटांतच हे विमान अचानक खाली आलं आणि कोसळलं. अपघातानंतर आकाशात काळ्या धुराचं प्रचंड जाळ पसरलं.
या विमानात एकूण 230 प्रवासी होते. यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक आणि 12 क्रू मेंबर्स होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही याच फ्लाइटमध्ये होते आणि त्यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
advertisement
संपूर्ण अपघातात फक्त एकच प्रवासी - विश्वास कुमार रमेश जिवंत वाचले आहेत. ते 11A सीटवर बसलेले होते. अपघात होण्याच्या सुमारे 30 सेकंद आधी त्यांनी इमर्जन्सी विंडोमधून उडी मारून आपली प्राणवाचवले.
ही घटना केवळ देशातच नव्हे तर जगभरात हळहळ निर्माण करणारी ठरली असून भगवद्गीतेचा अबाधित मिळालेला प्रतीचा व्हिडीओ धार्मिक आणि आध्यात्मिक वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.
मराठी बातम्या/Viral/
Air India Plane अपघातात चमत्कार, राखेतून असे काही सुरक्षित सापडले की सर्वांचं झाले नतमस्तक; विमानाचा लोखंडी वितळले, पण...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement