21000000 रुपयांचा विमा हडपण्यासाठी कट, बापानेच दिली मुलाच्या हत्येची सुपारी, पोलिसांनी असं उकललं गूढ

Last Updated:

उत्तर प्रदेशातील संभळमध्ये बाबूराम शर्मा यांनी अनिकेत शर्माची हत्या ५० हजार सुपारी देऊन केली. २.१० कोटी विमा क्लेमसाठी मोठ्या टोळीचा पर्दाफाश, पोलिसांनी आरोपींना अटक केली.

News18
News18
वडिलांनीच आपल्या मुलाच्या हत्येची सुपारी फक्त पैशांसाठी दिली, अनिकेत शर्माची हत्या त्यांनी स्वत: 50 हजार रुपयांची सुपारी देऊन केली. जेव्हा हा सगळा प्रकार समोर आला तेव्हा पोलीस आणि विमा कंपन्याही हादरल्या. मुलाच्या हत्येनंतर मृतदेह कुंदरकी परिसरात फेकून देऊन तो अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अनिकेतच्या नावावर २.१० कोटी रुपयांचा अपघात विमा होता. पोलिसांनी अनिकेतचे वडील बाबूराम शर्मा आणि हत्येच्या कटात सामील असलेल्या तिघांना अटक केली आहे, तर मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
दारू आणि भांडण ठरलं कारण
आरोपी वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत सतत घरी दारू पिऊन धिंगाणा घालायचा. या त्रासातून मुक्त होण्यासाठी आणि विम्याचे पैसे हडपण्यासाठी आरोपी बाबूरामने अमरोहा येथील वकील आदेश कुमार या साथीदाराशी संपर्क साधला. या वकिलाने २ जानेवारी २०२४ रोजी अनिकेतचे एचडीएफसी बँकेत खाते उघडले आणि काही दिवसांतच टाटा कंपनीची २.१० कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली. बाबूरामला मात्र हा विमा केवळ २५ लाखांचा असल्याचे सांगितले होते.
advertisement
वडिलांना २५ लाखांचे आमिष
मार्च २०२४ मध्ये बाबूराम चोरीच्या एका प्रकरणात तुरुंगात गेला असताना, या वकिलानेच विम्याचे हप्ते भरले. बाबूराम जामिनावर सुटल्यावर या वकिलाने अनिकेतच्या हत्येचा कट रचला आणि २५ लाखांचे आमिष दाखवून खुद्द बाबूरामलाही या कटात सामील केलं. वडिलांच्या मदतीने बाबूरामने रामपूरच्या असलम उर्फ सुल्तानला साडेतीन लाख रुपयांची सुपारी दिली. असलमने त्याच्या दोन साथीदारांसह १६ नोव्हेंबरच्या रात्री अनिकेतच्या डोक्यात रॉड मारून त्याची क्रूरपणे हत्या केली आणि मृतदेह शेतात फेकून दिला.
advertisement
१०० कोटींचा क्लेम हडपणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पोलिसांच्या तपासात समोर आलेली माहिती अधिक धक्कादायक आहे. संभळ परिसरात ही विम्याचा क्लेम हडपणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भाग असल्याचे उघड झाले आहे. या टोळीने संभळ जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये चार हत्या करून १०० कोटी रुपयांहून अधिक विम्याचा क्लेम हडपला आहे. या टोळीत बँक कर्मचारी, ग्राम प्रधान, आशा वर्कर, जनसेवा केंद्र चालक, आणि खुद्द विमा कंपन्यांचे अधिकारी व तपासनीस यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यात घडली. विमा क्लेम हडपण्यासाठी झालेल्या हत्येच्या एका धक्कादायक घटनेचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
21000000 रुपयांचा विमा हडपण्यासाठी कट, बापानेच दिली मुलाच्या हत्येची सुपारी, पोलिसांनी असं उकललं गूढ
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement