Air India Plane Crash: "माझा लेक जिंवत, त्याने इमारतीवरून उडी मारली",आईने रडत रडत सगळं सांगितलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लंडनला जाणारे विमान हे अहमदाबादच्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले यामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Gujarat Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय 171 हे विमान कोसळलं. एअर इंडियाचं हे विमान टेक ऑफ नंतर लगेचच कोसळलं. उड्डाण केल्यानंतर 10 मिनिटातच हे विमान मेडिकल कॉलेजच्या मेसवर कोसळले. दुपारची जेवणाची वेळ असल्याने मेसमध्ये मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर येत आहे.पण या दुर्घटनेत एका मुलाचा जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे. रमीला नावाच्या महिलेनं या संदर्भातील माहिती दिली आहे.
लंडनला जाणारे विमान हे अहमदाबादच्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. एएनआय या वृत्तसंस्थेला रमीला बेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्टेलच्या इमारतीवर प्लेन क्रॅश झाले. त्यावेळी त्यांचा मुलगा लंच ब्रेकसाठी गेला होता. परंतु त्याला काही झाले नाही तो सुखरुप आहे.माझे त्याच्याशी फोनवर बोलणे झाले त्याने सुखरुप असल्याची माहिती दिली. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत जीव वाचवला. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने तो जखमी झाला. मलाा त्याला भेटायला जायचे आहे, जेव्हा मी त्याला भेटेल त्यावेळीच मला त्याची तब्येक रळी आहे हे कळेल.
advertisement
Watch Video:
#WATCH एयर इंडिया विमान दुर्घटना: गुजरात के अहमदाबाद के सिविल अस्पताल पहुंची रमीला ने कहा, "मेरा बेटा लंच ब्रेक के दौरान हॉस्टल गया था और विमान वहीं दुर्घटनाग्रस्त हो गया। मेरा बेटा सुरक्षित है और मेरी उससे बात हुई है। वह दूसरी मंजिल से कूद गया था इसलिए उसे कुछ चोटें आई हैं।" pic.twitter.com/AFgdvWiV0k
— ANI_HindiNews (@AHindinews) June 12, 2025
advertisement
हॉस्टेलमध्ये जीवीतहानी झाल्याची भिती
एअर इंडियाचे विमान ज्या हॉस्टेलवर कोसळले तिथे देखील मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या संदर्भात कोणतेही अधिकृत वृत्त आलेले नाही. जगभरातील अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या विमानात 242 प्रवासी होते त्यातील 169 भारतीय प्रवाशी होती. दो पायलट आणि 10 क्रू मेंबरचा देखील यामध्ये समावेश होता. ज्या इमारतीवर हे विमान कोसळले ती जळून खाक झाली आहे. मेघानी नगरचा परिसर हा सरदार वल्लभ भाई पटेल एअरपोर्टजवळचा परिसर आहे. मेघानी नगर परिसरातच एक हॉस्टेल देखील आहे.
advertisement
माजी मुख्यमंत्री रुपाणी हे देखील विमानात
या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते. ते त्यांच्या मुलीला आणि बायकोला भेटण्यासाठी लंडनला जात होते. उड्डाणानंतर पाच मिनिटांतच विमान कोसळले. बोईंग ड्रीमलायनर 787 मध्ये 300 प्रवाशांची आसन क्षमता होती. पायलटने MAYDAY कॉल केला. MAYDAY कॉल म्हणजे आपत्कालीन परिस्थिती.
एअर इंडियाने जारी केला हेल्पलाइन नंबर
advertisement
घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एअर इंडियाने 18005691444 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
June 12, 2025 6:30 PM IST
मराठी बातम्या/देश/
Air India Plane Crash: "माझा लेक जिंवत, त्याने इमारतीवरून उडी मारली",आईने रडत रडत सगळं सांगितलं