IPS अधिकाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या, पत्नी मुख्यमंत्र्यांसह जपान दौऱ्यावर असताना डोक्यात गोळी झाडली

Last Updated:

२०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी पुरण सिंग यांनी त्यांच्या घरात स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती आहे.

IPS Suicide-
IPS Suicide-
चंदिगढ: हरियाणा केडरचे एडीजीपी दर्जाचे आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चंदीगढ सेक्टर ११ या राहत्या सरकारी निवासस्थानी त्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या घटेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एडीजीपी पुरण कुमार हे रोहतकमधील सुनारिया येथील पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयात सध्या कार्यरत होते. मंगळवारी दुपारी त्यांचा मृतदेह चंदीगडच्या सेक्टर ११ येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आढळला. घटनेची माहिती मिळताच, चंदीगड पोलिसांचे फॉरेन्सिक पथक आणि सीएफएसएल पथक पोहचले असून सध्या तपास सुरू आहे. २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी पुरण सिंग यांनी त्यांच्या घरात स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती आहे. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी जमली आहे .
advertisement

गेल्या दीड वर्षापासून सातत्याने चर्चेत

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाय. पुरण कुमार यांचा मृतदेह घराच्या बेसमेंटमध्ये आढळला. सर्वप्रथम त्यांच्या मुलीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्यानंतर मुलीने तात्काळ पोलिसांना फोन करत याविषय माहिती दिली. पुरण सिंग हे एडीजीपी पदावर होते, परंतु त्यांना आयजी म्हणून बढती देण्यात आली. आयजी वाय पुरण कुमार यांनी गेल्या वर्षी वन ऑफिस वन पॉलिसी या धोरणांतर्गत तक्रार केली होती. त्यांनी आरोप केला होता की, अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी एकापेक्षा जास्त सरकारी निवासस्थाने ताब्यात ठेवली होती. शिवाय, त्यांनी माजी डीजीपी आणि अतिरिक्त मुख्य सचिवांविरुद्ध जातीवरून भेदभाव केल्याची तक्रार देखील आयोगाकडे केली होती. गेल्या दीड वर्षापासून सातत्याने चर्चेत होते.
advertisement

आत्महत्येवेळी पत्नी जपान दौऱ्यावर

अमनीत पी. ​​कुमार या देखील आयएएस अधिकारी आहेत. जपानला जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांसोबत होत्या. त्यांचा मृतदेह चंदीगडच्या सेक्टर 11 येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आढळला. त्यांचा मृतदेह सेक्टर १६ रुग्णालयात नेण्यात आला आहे.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सेक्टर 16 मधील रुग्णालयात 

या विषयी माहिती देताना एसएसपी कंवरदीप कौर यांनी सांगितले की, त्यांना दुपारी १:३० वाजता गोळीबाराची माहिती मिळाली. सीएफएसएल या टीम तपास करत आहे आणि तपास सुरू आहे. आत्महत्येच्या वेळी घरी उपस्थित असलेल्यांचीही चौकशी केली जात आहे आणि त्यांचे जबाब घेतले जात आहेत.पूरन सिंग यांनी स्वत:वर किती गोळ्या झाडल्या याची माहिती समोर आलेली नाही. मृतदेहाला सेक्टर 16 मधील रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले.
मराठी बातम्या/देश/
IPS अधिकाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या, पत्नी मुख्यमंत्र्यांसह जपान दौऱ्यावर असताना डोक्यात गोळी झाडली
Next Article
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement