हरियाणवीत बोल! नाशिकच्या तरुणाला दिला दम; पुढे जे झाले त्यावर विश्वास बसणार नाही, Video
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Viral Video: हरियाणातील एका व्हिडिओमध्ये हरियाणवी व्यक्ती आणि नाशिकच्या तरुणाचा संवाद दाखवला आहे. एकतेचा संदेश देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चंदिगड : महाराष्ट्रात तिसरी भाषा हिंदीच्या सक्तीवरून काही दिवसांपूर्वी वातावरण तापले होते. यावरून सोशल मीडियावर देखील बरीच चर्चा झाली. अशात हरियाणामधील एका हृदयस्पर्शी व्हिडीओने सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकली आहेत. या व्हिडीओमध्ये एकतेचा आणि खर्या भारतीयत्वाचा संदेश देणारा प्रसंग पाहायला मिळतो आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. या व्हिडिओमध्ये हरियाणातील एका हरियाणवी व्यक्ती आणि नाशिक (महाराष्ट्र) येथील तरुण यांच्यातील संवाद शुट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक हरियाणवी व्यक्ती मोठ्याने विचारतो – इथे महाराष्ट्रातून कोण आहे? येथे उपस्थितीत असलेल्या पैकी एक तरूण पुढे येतो. संबंधित तरुण जवळ आल्यावर ती व्यक्ती विचारते तुझे गाव कोणते? तो तरुण नाशिक असे उत्तर देतो. तेव्हा हरियाणवी व्यक्ती त्याला म्हणते – हरियाणवीत बोल!
advertisement
तरुण उत्तर देतो की, मला ती भाषा येत नाही. यावर तो माणूस थोड्या मोठ्या आवाजात आणि दम दिल्याप्रमाणे म्हणतो, मग इथे कसा आलास? इथे कसं काम करतोस? हे प्रश्न ऐकल्यावर तो तरुण थोडा नाराज होतो. मात्र ती व्यक्ती लगेचच सुर बदलते आणि म्हणते – अरे, हा तुझाच देश आहे. तू इथे काम करणार नाहीस तर कोण करणार? हे तुझं राष्ट्र आहे – जे करायचं आहे ते कर.
advertisement
advertisement
त्यानंतर हरियाणवी व्यक्ती नाशिकच्या त्या मुलाला जवळ घेत मिठी मारते आणि दोघे मनापासून हसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर प्रतिक्रिया देखील येत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 10:27 PM IST
मराठी बातम्या/देश/
हरियाणवीत बोल! नाशिकच्या तरुणाला दिला दम; पुढे जे झाले त्यावर विश्वास बसणार नाही, Video