मला जगायचं होतं, पण...; आई, माझ्या मुलांची काळजी घे, BLO ऑफिसरचा हृदय पिळवटणारा Video
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Moradabad BLO Officer: मुरादाबादमध्ये कामाच्या प्रचंड तणावाने त्रस्त झालेल्या एका BLO अधिकाऱ्याने आत्महत्या केली असून, त्याचा रडवणारा शेवटचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात भावनिक खळबळ उडाली आहे. “मला जगायचं होतं, पण दबाव खूप झाला” असे सांगताना त्याचे शब्द मनाला चटका लावणारे आहेत.
मुरादाबाद: कामाच्या प्रचंड तणावामुळे एका बूथ लेव्हल ऑफिसरने (BLO) आत्महत्या केल्यानंतर एक भावनिक आणि हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये 46 वर्षीय अधिकारी रडत रडत सांगत आहे की "मला जगायचं होतं, पण दबाव खूप जास्त होता." त्याच्या बोलण्यातून त्याने गेल्या काही दिवसांपासून कोणत्या मानसिक वेदना झेलल्या हे स्पष्टपणे जाणवत आहे.
advertisement
व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “दिदी, मला माफ करा. आई, माझ्या मुलांची काळजी घ्या. मी या निवडणूक कामात अपयशी ठरलो. मी एक पाऊल उचलणार आहे आणि यासाठी फक्त मीच जबाबदार आहे. कोणाचाही काही दोष नाही. मी खूप त्रस्त आहे. मला गेल्या 20 दिवसांपासून झोप आली नाही. वेळ मिळाला असता तर हे काम पूर्ण केले असते. माझ्या चार लहान मुली आहेत… मला माफ करा. मी तुमच्या जगापासून खूप दूर जात आहे.
advertisement
मुरादाबाद : BLO की आत्महत्या से पहले का वीडियो, SIR के टारगेट से परेशान था... आत्महत्या से पहले का वीडियो आया सामने#Moradabad #BLO pic.twitter.com/jUelN5kzjB
— News18 Uttar Pradesh (@News18UP) December 1, 2025
सर्वेश कुमार हे सरकारी शाळेत सहाय्यक शिक्षक होते आणि त्यांना प्रथमच 7 ऑक्टोबर रोजी BLO ची जबाबदारी देण्यात आली होती. या कामात त्यांना घराघर जाऊन मतदारांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे गोळा करावी लागत होती. वाढते कामाचे ओझे आणि सततचा दबाव यामुळे ते मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झाल्याचे संकेत त्यांच्या आत्महत्येपूर्वीच्या वर्तनातून मिळतात.
advertisement
रविवारी सकाळी त्यांच्या पत्नी बबली यांनी घरी त्यांना मृत अवस्थेत आढळले. त्यांच्या सोडून गेलेल्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे लिहिले होते की BLO च्या जबाबदारीचा ताण ते सहन करू शकत नव्हते. पत्रात त्यांनी लिहिले, मला जगायचे आहे, पण काय करू? मी एका मोठ्या संकटात अडकलो आहे. सर्व बाजूंनी परिस्थिती कठीण झाल्या आहेत. भीती वाटते. हे लिहितानाही मी खूप वेदनेत आहे. मी नेहमी माझ्या कुटुंबाची व जबाबदाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
पत्राच्या शेवटी त्यांनी विनंती केली, आता माझ्या पत्नीला मदतीची गरज आहे. कृपया तिच्या आयुष्याच्या पुढच्या प्रवासात तिला आधार द्या. अधिकाऱ्यांनी समजून घ्यावे की माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 11:05 PM IST
मराठी बातम्या/देश/
मला जगायचं होतं, पण...; आई, माझ्या मुलांची काळजी घे, BLO ऑफिसरचा हृदय पिळवटणारा Video


