पतीचं 'माकड' म्हणणं जीवाला लागलं; प्रेमविवाहानंतर तनुचं थरकाप उडवणारं पाऊल, पोलीसही सुन्न
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
चार वर्षांचा प्रेमविवाह अन् थट्टा ठरली जीवघेणी! मॉडेलिंगची आवड असलेल्या तनुने पतीच्या मस्करीनंतर उचललं टोकाचं पाऊल; पोलीसही सुन्न
थट्टा-मस्करी ही संसारातील गोडवा वाढवण्यासाठी असते, पण कधी कधी याच मस्करीची कुस्करी होऊ शकते. कधीतरी ती अंगाशी येते, असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. पतीनं सर्वांसमोर पत्नीची मस्करी केली आणि ती तिच्या जिव्हारी लागली. त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. मस्करीने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पतीने पत्नीला गंमतीने माकडीण म्हटल्यामुळे पत्नी इतकी दुखावली गेली की, तिने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. तनु सिंह असं या महिलेचं नाव असून, अवघ्या चार वर्षांपूर्वीच तिने राहुल श्रीवास्तवसोबत प्रेमविवाह केला होता.
नेमकं काय घडलं त्या दिवशी?
बुधवारी संध्याकाळी राहुल, तनु आणि तिची बहीण अंजली हे सर्वजण सीतापूर इथून नातेवाईकाकडून घरी परतले होते. घरी आल्यावर सर्वजण बसून हसून-खेळून गप्पा मारत होते. गप्पांच्या ओघात राहुलने तनुला थट्टेने माकडीण म्हटलं. तनुला मॉडलिंगची खूप आवड होती आणि ती आपल्या सौंदर्याबाबत खूप संवेदनशील होती. पतीच्या या शब्दांनी तिला इतकं अस्वस्थ केलं की, ती रागाने दुसऱ्या खोलीत गेली आणि स्वतःला कोंडून घेतलं.
advertisement
दरवाजा उघडला अन् समोर काळ उभा होता...
बराच वेळ झाला तरी काहीच आवज नाही, आरडाओरडा नाही. कोणतीही हालचाल जाणवली नाही. काही वेळाने राहुल जेव्हा जेवण घेऊन घरी आला, तेव्हा त्याने मेहुणी अंजलीला तनुला बोलावण्यास सांगितले. बराच वेळ हाका मारूनही आतून प्रतिसाद आला नाही. संशय आल्याने राहुलने खिडकीतून डोकावून पाहिले, तेव्हा त्याला समोरचे दृश्य पाहून धक्काच बसला. तनुने छताच्या हुकाला साडीचा फास लावून आत्महत्या केली होती. आरडाओरडा करून दरवाजा तोडून तिला रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
advertisement
मॉडेलिंगचे स्वप्न आणि एका शब्दाचा घाला
तनुची बहीण अंजलीने सांगितले की, तनुला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे होते. पतीच्या त्या एका शब्दाने तिचा स्वाभिमान दुखावला गेला असावा. पोलिसांनी सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. एका किरकोळ शब्दाने घडलेला हा भीषण प्रकार पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पतीनं केलेली मस्करी त्याच्याच अंगाशी आली आणि घरात शोककळा पसरली. ही धक्कादायक घटना लखनऊमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
Jan 30, 2026 12:10 PM IST
मराठी बातम्या/देश/
पतीचं 'माकड' म्हणणं जीवाला लागलं; प्रेमविवाहानंतर तनुचं थरकाप उडवणारं पाऊल, पोलीसही सुन्न










