भारताने पाकिस्तानी चौक्या, दहशतवादी लाँचपॅड उडवले, हल्ल्याचा LIVE VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मध्यरात्री पाकिस्तानकडून केलेल्या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा स्विकारला असून पाकिस्तानच्या लष्करी चौक्या आणि दहशतवादी लाँचपॅडवर हल्ला केला. या हल्ल्याचा LIVE व्हिडीओ समोर आला आहे.
दिल्ली: मागील तीन दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्तानने भारताची राजधानी दिल्लीच्या दिशेनं थेट मिसाईल सोडलं होतं. मात्र भारतीय एअर डिफेन्स फोर्सने हा हल्ला परतवून लावला आहे. दिल्लीच्या दिशेनं येणारं हे मिसाईल भारताने हरियाणाच्या सिरसा परिसरात पाडलं. यामुळे राजधानी दिल्लीवरील मोठा धोका टळला आहे.
पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा स्विकारला असून पाकिस्तानच्या लष्करी चौक्या आणि दहशतवादी लाँचपॅडवर हल्ला केला. भारताने ही दोन्ही ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. ही दोन्ही ठिकाणं भारतावर ड्रोन हल्ला करण्यासाठी वापरली जात होती. त्यामुळे भारताने थेट पाकिस्तानच्या मुळावर घाव घातला आहे.
अलीकडेच या लाँच पॅडमधून मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. भारताच्या उत्तरेकडील लेहपासून दक्षिणेकडील सर क्रीकपर्यंत २६ ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे लाँचपॅड उद्ध्वस्त केले. या हल्ल्याचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
#WATCH | Pakistani Posts and Terrorist Launch Pads from where Tube Launched Drones were also being launched, have been destroyed by the Indian Army positioned near Jammu: Defence Sources
(Source - Defence Sources) pic.twitter.com/7j9YVgmxWw
— ANI (@ANI) May 10, 2025
advertisement
पाकिस्तानने रात्रभर सीमेपलीकडून गोळीबार सुरू ठेवला. कुपवाडामध्ये ब्लॅकआऊट लागू करण्यात आला होता. या गोळीबारात जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरावर गोळीबार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी पुष्टी काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली.
Location :
Delhi
First Published :
May 10, 2025 8:27 AM IST