Operation Sindoor and Golden Temple: सुवर्णमंदिरात असं कधीच घडलं नाही, का मोडावी लागली परंपरा? भारताच्या लष्करी अधिकाऱ्याने दिली अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Operation Sindoor and Golden Temple: इतक्या वर्षात जे कधी घडलं नाही ते करावं लागलं, मोडावी लागली परंपरा, लेफ्टिनंट जनरल डी कुन्हा यांनी दिली महत्त्वाची अपडेट
इतक्या वर्षात जे कधीही घडलं नाही ते करावं लागलं. सुवर्ण मंदिर ज्यासाठी प्रसिद्ध आहे तीच परंपरा मोडावी लागल्याची माहितीय भारतीय लष्करी अधिकाऱ्याने दिली आहे. सुवर्ण मंदिरातील ती परंपरा मोडली खरी पण त्यामुळे पाकिस्तानचे नापाक इरादे त्यामुळेच हाणून पाडायला मदत झाल्याचंही लेफ्टिनंट जनरल डी’कुन्हा यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते गरजेचं होतं असंही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने अमृतसरमधील शीखांच्या सर्वात पवित्र धर्मस्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरावर अनेक हल्ले करण्याचे प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने हे सर्व हल्ले हाणून पाडले. यासाठी आकाश मिसाइल सिस्टीम आणि अँटी मिसाइल गनचा वापर करण्यात आला.
ऑपरेशनदरम्यान पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सुमेर इवान डी कुन्हा यांनी सांगितले की, सुवर्ण मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सैन्याला मंदिरात शस्त्रे बसवण्याची परवानगी दिली होती. हे सर्व ऑपरेशन सिंदूरदरम्यान घडले, जेव्हा पाकिस्तानने भारताच्या धार्मिक आणि नागरी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत लेफ्टनंट जनरल डी’कुन्हा म्हणाले की, सुवर्ण मंदिराचे प्रधान ग्रंथी आणि व्यवस्थापनाने सैन्याला पूर्ण मदत केली. पाकिस्तानच्या ड्रोनला सहजपणे पाहता यावे यासाठी मंदिराची लाईट पहिल्यांदा बंद करण्यात आली. ते म्हणाले की, प्रधान ग्रंथींनी आम्हाला शस्त्रे बसवण्याची परवानगी दिली. लाईट बंद केल्याने आम्हाला ड्रोन पाहण्यास आणि त्यांचा सामना करण्यास मदत मिळाली. यामुळे भारतीय सैन्याला पाकिस्तानचे हल्ले रोखणे सोपे झाले.
advertisement
लेफ्टनंट जनरल म्हणाले की, पाकिस्तान धार्मिक स्थळे आणि सामान्य लोकांना लक्ष्य करू शकतो, असा संशय सैन्याला पूर्वीपासून होता. ते म्हणाले की, आम्हाला माहीत होते की पाकिस्तान आमच्या मंदिरांवर आणि शहरांवर हल्ला करू शकतो. त्यांना देशात भीती आणि अशांती पसरवायची होती. त्यामुळे आम्ही पूर्वीपासून तयारी केली होती. सैन्याने आपली हवाई संरक्षण प्रणाली जसे की आकाश मिसाइल सिस्टीम आणि एल-७० बंदुकांचा वापर करून हल्ले हाणून पाडले.
advertisement
लेफ्टनंट जनरल डी कुन्हा यांनी सुवर्ण मंदिराच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, जेव्हा आम्ही त्यांना धोक्याबद्दल सांगितले, तेव्हा ते त्वरित तयार झाले. त्यांनी आम्हाला मंदिर वाचवण्यासाठी शस्त्रे बसवण्याची परवानगी दिली. मंदिराची लाईट बंद केल्याने आकाश स्पष्ट दिसले आणि ड्रोन पाहणे सोपे झाले. दररोज लाखो लोक सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी येतात, त्यामुळे त्याची सुरक्षा खूप महत्त्वाची होती.
advertisement
अलीकडेच झालेल्या भारत-पाकिस्तान तणावाच्या वेळी पाकिस्तानने सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील इतर शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने हे सर्व हल्ले पूर्णपणे हाणून पाडले. १५ व्या इन्फंट्री डिवीजनचे कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री यांनी सांगितले की, ८ मे च्या सकाळी पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. पण आमची सेना तयार होती. आमच्या सैनिकांनी सर्व हल्ले निष्फळ केले आणि सुवर्ण मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही.
advertisement
सैन्याने दाखवली आपली ताकद
भारतीय सैन्याने एका व्हिडिओमध्ये दाखवले की त्यांनी पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे कसे थांबवले. यात आकाश मिसाइल सिस्टीम आणि एल-७० हवाई संरक्षण बंदुकांचा वापर करण्यात आला होता. मेजर जनरल शेषाद्री म्हणाले की, आमच्या गुप्त माहितीनुसार सुवर्ण मंदिर त्यांचे मुख्य लक्ष्य होते. आम्ही पूर्वीपासून तयारी केली होती आणि पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.
Location :
Punjab
First Published :
May 20, 2025 11:55 AM IST
मराठी बातम्या/देश/
Operation Sindoor and Golden Temple: सुवर्णमंदिरात असं कधीच घडलं नाही, का मोडावी लागली परंपरा? भारताच्या लष्करी अधिकाऱ्याने दिली अपडेट