सोनम बेवफा है! राजसाठी राजाचा खेळ खल्लास, रघुवंशी हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण? नाव आलं समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Indore Couple Missing Case: हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेलेल्या इंदूरमधील व्यवसायिक राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली. राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यावर या हत्येचा आरोप आहे.
Sonam Raghuwanshi Arrested : हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेलेल्या इंदूरमधील व्यवसायिक राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली. राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यावर या हत्येचा आरोप आहे. सध्या पोलिसांनी सोनमला अटक केली आहे. या संपूर्ण नियोजनात सोनम एकटी नव्हती, असं सांगितलं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकी ठाकूर, आकाश आणि आनंद यांनी मिळून राजाची हत्या केली. या संपूर्ण कटाचा सूत्रधार राज कुशवाह असल्याची माहिती आता समोर आली आहे. सोनमचे राजशी प्रेमसंबंध होते. यातूनच हे हत्याकांड घडल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी आरोपी आनंदला मध्यप्रदेशातील सागर येथून अटक केली आहे.
सोनमचे नोकरासोबत प्रेमसंबंध
सोनम आणि राज एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते. दोघेही सातत्याने फोनवरून संपर्कात होते. त्यांच्यात तासनतास बोलणं व्हायचं. पोलिसांनी सोनमचा फोन ट्रेस केला. कॉल डिटेल्समध्ये सोनम आणि राज यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. सोनमचा प्लायवूडचा व्यवसाय होता. इथं राज हा बिलिंग एजंट म्हणून काम करायचा. याच दरम्यान दोघांची ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. राज हा सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे.
advertisement
लग्नानंतर सहाव्या दिवशी रचला हत्येचा कट
सोनमचं राजा रघुवंशीसोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या सहाच दिवसात सोनमने राजला हाताशी धरून राजाच्या हत्येचा कट रचला. राज हाच या हत्याकांडाचा मास्टरमाइंड आहे. सोनमसोबत प्लॅन झाल्यानंतर राजने आपला मित्र विशाल सिंग, आनंद कुर्मी, आकाश राजपूत यांनाही कटात सहभागी करून घेतली. प्लॅननुसार त्यांना गुवाहाटीला पाठवले. ज्यावेळी राजा आणि सोनम हनिमूनसाठी शिलाँगला पोहोचले. तेव्हा विशाल, आनंद आणि आकाश हे तिघेही तिथे पोहोचले. संधी साधून तिघांनी प्लॅन करून राजाची हत्या केली. सोनम स्वत: राजला हत्येच्या ठिकाणी घेऊन गेली होती.
advertisement
मध्य प्रदेशातून सोनमच्या साथीदारांना अटक
राजा रघुवंशी हत्याकांडात आकाश नावाच्या तरुणाला ललितपूर येथून अटक करण्यात आली होती. आकाश हा देखील या प्रकरणात आरोपी आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की आरोपी आनंद हा उत्तर प्रदेशातील ललितपूरजवळील चौकी गावातील रहिवासी आहे. रविवारी रात्री उशिरा मेघालय पोलिसांनी सागर येथून आरोपी आनंदला अटक केली.
माझी मुलगी निर्दोष- सोनमच्या वडिलांची प्रतिक्रिया
advertisement
सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंह यांनी म्हटले आहे की त्यांची मुलगी सोनम निर्दोष आहे. एवढेच नाही तर त्यांनी मेघालय पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणतात की, हे लग्न दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने झालं. मेघालय सरकार पहिल्या दिवसापासून खोटे बोलत आहे. माझी मुलगी काल रात्री गाजीपूरमधील एका ढाब्यावर आली आणि तिच्या भावाला फोन केला. पोलिस ढाब्यावर गेले आणि तिथून तिला घेऊन गेले. मी माझ्या मुलीशी बोलू शकलो नाही. माझी मुलगी असे का करेल, तिच्या पतीला का मारेल? मेघालय पोलिस पूर्णपणे खोटे बोलत आहेत. मी गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआय चौकशीची विनंती करतो. माझी मुलगी १०० टक्के निर्दोष आहे.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
June 09, 2025 12:33 PM IST
मराठी बातम्या/देश/
सोनम बेवफा है! राजसाठी राजाचा खेळ खल्लास, रघुवंशी हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण? नाव आलं समोर