Jaisalmer bus fire : ती बनली 20 प्रवाशांसाठी कर्दनकाळ, डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालं, बसची Inside Story

Last Updated:

जैसलमेरजवळ फटाक्यांनी भरलेल्या बसला आग लागून २० प्रवाशांचा मृत्यू, १६ गंभीर जखमी. शॉर्ट सर्किट आणि फायर सेफ्टी अभावामुळे दुर्घटना घडली. चौकशी सुरू.

News18
News18
जैसलमेर: बसमधून धूर निघाल्यानंतर बस थांबवण्यात आली, मात्र ती 57 प्रवाशांसाठी क्षणात कर्दनकाळ ठरली. डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालं. धूर निघाल्यानंतर पुढच्या क्षणी आग लागली आणि होत्याचं नव्हतं झालं. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी होती. प्रवासी जीव वाचवण्यासाठी ओरडत होते. उंच आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत होता. बसमधून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांचा गोंधळ सुरू झाला अन् 20 प्रवाशांचा आतापर्यंत या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
कशी लागली आग?
या दुर्घटनेत 16 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या जैसलमेर इथून 20 किमी दूर अंतरावर या बसला भीषण आग लागली. बसमध्ये फटाक्यांचं सामान होतं. त्यामुळे आधीच शॉर्ट सर्किट किंवा इंजिनमध्ये बिघाड यामुळे बसमध्ये आग लागली आणि ती फटाक्यांमुळे संपूर्ण पसरल्याचं सांगितलं जात आहे. मृत व्यक्तींना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. बसमधून फटाके नेण्याची परवानगी नसतानाही कसे घेऊन जात होते यावरही प्रश्नचिन्हं उपस्थित होतं आहे. प्रवाशांना जीव वाचवण्यासाठी पळण्याचा अवधीही मिळाला नाही.
advertisement
पोलीस, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
बसमधून फटाके फुटतात तसे आवाज येऊन भीषण आग लागली आणि काही क्षणात संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी होती. बसचा फक्त सांगाडा उरला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना ३ रुग्णवाहिकांमधून जवाहर रुग्णालयात नेण्यात आलं आहे, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १५ जखमींना दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जोधपूरला रेफर करण्यात आलं आहे.
advertisement
कुठे घडली घटना? बस झाली 'आगीचा गोळा'
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात थईयात गावाजवळ मंगळवारी दुपारी जोधपूरकडे जाणाऱ्या एका खासगी बसला भीषण आग लागून भीषण दुर्घटना घडली. काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. या भीषण दुर्घटनेत २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी ३ वाजता ५७ प्रवाशांना घेऊन ही बस जैसलमेरहून जोधपूरकडे जात होती. जैसलमेर-जोधपूर महामार्गावर प्रवास करत असताना अचानक बसच्या मागील बाजूने धूर येऊ लागला. चालकाने लगेच बस रस्त्याच्या कडेला थांबवली, पण प्रवाशांना पूर्णपणे बाहेर पडायची संधी मिळण्यापूर्वीच बसला आग लागली आणि पुढच्या क्षणी रौद्र रुप धारण केलं.
advertisement
शॉर्ट सर्किटमुळे लागली आग?
पोलीस तपासातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज आहे. भाजपचे पोकरणचे आमदार प्रताप पुरी यांनी सांगितले की, जैसलमेरहून सुटल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच बसला आग लागली. आग इतकी भयंकर होती की, लोकांना बाहेर पडायला वेळच मिळाला नाही. बसमध्ये अडकलेल्या 19 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एका प्रवाशाने जोधपूरला नेत असताना वाटेत प्राण सोडला. १६ गंभीर जखमींवर जोधपूरमध्ये उपचार सुरू आहेत.
advertisement
advertisement
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरकाप उडवणारा अनुभव
घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला थरार काळजाचा ठोका चुकवणारा आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आग लागताच बसचा दरवाजा लॉक झाला, ज्यामुळे लोक आतच अडकून पडले. जैसलमेरच्या एका नागरिकाने सांगितले की, काही प्रवासी खिडक्यांमधून उड्या मारून बाहेर पडले, पण अनेक आत अडकले. लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे बचावकार्यात अडथळे आले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांनुसार जखमी लोकांची त्वचा जळाली होती, अनेकांच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. घटनास्थळी लोकांचे मृतदेह आणि जखमी लोक भोवळ येऊन पडले होते.
advertisement
मंत्री गजेंद्र सिंह खिमसर यांची माहिती
राजस्थानचे मंत्री गजेंद्र सिंह खिमसर यांनी सांगितले की, बसमध्ये ज्या प्रकारे स्फोट झाला आणि बस जळत होती, अशी घटना आयुष्यात कधी पाहिली नाही. बसमधील प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल. आग एवढ्या वेगाने का पसरली, याची चौकशी करण्यासाठी एफएसएल टीम तपास करेल. बसमध्ये फायर सेफ्टीची साधने नव्हती आणि कंप्रेसरचा स्फोट झाल्याने आग अधिक वेगाने पसरली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Jaisalmer bus fire : ती बनली 20 प्रवाशांसाठी कर्दनकाळ, डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालं, बसची Inside Story
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement