'तू प्रेमात पडशील...', हर्षितची गंभीरला गुरूदक्षिणा, बर्थडेच्या दिवशी दिलं स्पेशल गिफ्ट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याचा आज वाढदिवस आहे. गंभीरच्या वाढदिवशीच टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव करून त्याला गिफ्ट दिलं आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याचा आज वाढदिवस आहे. गंभीरच्या वाढदिवशीच टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव करून त्याला गिफ्ट दिलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज 2-0 ने जिंकल्यानंतर आता भारतीय टीम बुधवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. गौतम गंभीरच्या वाढदिवसानिमित्त टीम इंडियाचा फास्ट बॉलर हर्षित राणाने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. 'हॅपी बर्थडे गौती भाई, माझ्याकडे तुझ्यासाठी खास गिफ्ट आहे, ज्याच्या तू प्रेमात पडशील', असं हर्षित राणा म्हणाला आहे.
गंभीरने केली हर्षितची पाठराखण
हर्षित राणाच्या टीम इंडियामधल्या निवडीवरून वाद निर्माण झाला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू अश्विन आणि क्रिस श्रीकांत यांनी राणाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या सगळ्या टीकेवर गौतम गंभीरने प्रत्युत्तर दिलं आहे. 'हे लाजिरवाणं आहे, स्वतःचं युट्युब चॅनल चालवण्यासाठी तुम्ही 23 वर्षांच्या मुलाला लक्ष्य करत आहात. तुम्हाला टार्गेट करायचंच असेल, तर मला करा. मी ते हाताळू शकेन, पण तुमच्या युट्युब व्ह्यूजसाठी 23 वर्षांच्या मुलाला ट्रोल करणे लज्जास्पद आहे. राणाचे वडील निवड समितीमध्ये नाहीत, तो स्वतःच्या गुणवत्तेवर क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे त्या मुलाला लक्ष्य करू नका', असं गंभीर म्हणाला आहे.
advertisement

आयपीएल 2024 मध्ये हर्षित राणाने चांगली कामगिरी केली, तेव्हा गंभीर केकेआरचा प्रशिक्षक होता. केकेआर आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला, तर हर्षित राणाचीही टीम इंडियामध्ये निवड झाली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवेळी ऑस्ट्रेलियामध्ये हर्षित राणाने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 टेस्टमध्ये राणाने 50.70 च्या सरासरीने 4 विकेट घेतल्या. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कपसाठीही हर्षित राणाची भारतीय टीममध्ये निवड झाली. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजसाठीही राणा भारतीय टीममध्ये आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 11:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'तू प्रेमात पडशील...', हर्षितची गंभीरला गुरूदक्षिणा, बर्थडेच्या दिवशी दिलं स्पेशल गिफ्ट!