Stocks to Watch: उद्या बाजारात ‘कमाईची संधी’; गुंतवणूकदारांसाठी 10 जबरदस्त स्टॉक्सची यादी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: बुधवारीचा बाजार गुंतवणूकदारांसाठी थरारक ठरणार आहे. Persistent Systems, Tech Mahindra, Thyrocare आणि Ola Electricसह 10 कंपन्यांनी तिमाही निकाल, नवीन डील्स आणि प्रोजेक्ट अपडेट्स जाहीर केले आहेत. ज्यामुळे उद्याच्या सत्रात शेअर्समध्ये जबरदस्त हालचाल दिसू शकते.
मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी बुधवारीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 10 प्रमुख कंपन्यांनी आपल्या तिमाही निकालांपासून ते नव्या प्रकल्पांपर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या अपडेट्समुळे बाजारात या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय हालचाल दिसू शकते.
advertisement
1. Persistent Systems
मिड-टियर आयटी कंपनी Persistent Systems ने दुसऱ्या तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा 10% वाढून 471 कोटींवर पोहोचला आहे, जे बाजाराच्या 436 कोटींच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. कंपनीचे उत्पन्न 3,580 कोटींवर गेले असून हेही अपेक्षित 3,521 कोटींपेक्षा जास्त आहे. EBIT 583 कोटी झाला असून ऑपरेटिंग मार्जिन 15.5% वरून 16.3% पर्यंत सुधारले आहे.
advertisement
2. Tech Mahindra
आयटी दिग्गज Tech Mahindra च्या दुसऱ्या तिमाहीतील नफा आणि ऑपरेशनल इनकम दोन्हीमध्ये सुमारे 5% वाढ झाली आहे. मात्र नफा बाजाराच्या अपेक्षेपेक्षा थोडा कमी राहिला, पण महसुलाचे आकडे अंदाजापेक्षा चांगले निघाले. EBIT मध्ये 15% पेक्षा अधिक वाढ झाली असून, तिमाहीदरम्यान मार्जिनमध्येही सुधारणा दिसली आहे. बोर्डाने 15 प्रति शेअरचा इंटरिम डिव्हिडेंड जाहीर केला आहे.
advertisement
3. Thyrocare Technologies
Thyrocare Tech ने प्रभावी आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीचा निव्वळ नफा 79% वाढून 48 कोटींवर पोहोचला.महसूलात 22% वाढ होऊन तो 216.5 कोटींवर गेला. EBITDA मध्ये 47.5% वाढ झाली असून मार्जिन 27.2% वरून 32.9% पर्यंत झेपावले. कंपनीने 7 प्रति शेअर डिव्हिडेंड आणि 2:1 बोनस शेअर इश्यू जाहीर केला आहे.
advertisement
4. Kolte Patil Developers
रिअल इस्टेट क्षेत्रातील Kolte Patil Developers ने Q2 मध्ये मिश्रित निकाल सादर केला. कंपनीची सेल्स व्हॅल्यू 13% घटून 670 कोटींवर आली, तर सेल्स व्हॉल्यूम 17% घटून 0.86 मिलियन चौरस फूट राहिले. मात्र प्रति चौरस फूट रिअलायझेशन 5% वाढून 7,823 वर गेले. कलेक्शनमध्ये 8% वाढ होऊन ते 596 कोटींवर पोहोचले, जे कंपनीच्या मजबूत कॅश फ्लोचे लक्षण आहे.
advertisement
5. ICICI Lombard General Insurance
विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ICICI Lombard ने मागील वर्षाच्या तुलनेत नफ्यात 18% वाढ नोंदवली. कंपनीचे एकूण उत्पन्न 12% पेक्षा अधिक वाढले आहे. बोर्डाने 6.5 प्रति शेअर डिव्हिडेंड जाहीर केला असून रेकॉर्ड डेट 23 ऑक्टोबर निश्चित केली आहे.
advertisement
6. Sula Vineyards
Sula Vineyards च्या निव्वळ महसुलात 1.1% घट होऊन तो 139.7 कोटींवर आला आहे. त्यातील ‘Own Brands’ महसूल 2.5% घटून ₹124.1 कोटी झाला आहे. मात्र Wine Tourism Segment मध्ये सुधारणा दिसली असून महसूल 7.7% वाढून 13.2 कोटी झाला आहे.
7. Cyient DLM
Cyient DLM च्या नफ्यात लक्षणीय सुधारणा दिसली. कंपनीचा तिमाही नफा 15 कोटींवरून 32 कोटींवर गेला. मात्र महसूल 20.3% घटून 310.6 कोटींवर आला. EBITDA किंचित कमी होऊन 31.1 कोटी झाला, परंतु मार्जिन 8.1% वरून 10% पर्यंत सुधारले आहे.
8. G R Infraprojects (G R Infra)
कंपनीने जाहीर केले की 9 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आयकर विभागाने शोधमोहीम (Raid) राबवली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या तपासामुळे दैनंदिन व्यवसायावर कोणताही परिणाम झाला नाही आणि सर्व कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे.
9. Ola Electric
इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता Ola Electric ने शेअर बाजाराला कळवले की कंपनी 17 ऑक्टोबर 2025 रोजी नवीन उत्पादन (Product Launch) सादर करणार आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 0.54% घसरून 50.00 वर बंद झाला.
10. CM Shriram Ltd
CM Shriram Ltd ने गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील झाघडिया येथील आपल्या केमिकल कॉम्प्लेक्समध्ये 35,000 टन प्रति वर्ष (TPA) क्षमतेचा Epichlorohydrin (ECH) प्लांट सुरू केल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या मते, उर्वरित 17,000 TPA क्षमतेचा प्लांट लवकरच सुरू केला जाईल.
Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 11:26 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Stocks to Watch: उद्या बाजारात ‘कमाईची संधी’; गुंतवणूकदारांसाठी 10 जबरदस्त स्टॉक्सची यादी