Pune News : एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या घातल्या, डोकं फुटेपर्यंत मारलं,पुण्यातील डेक्कन चौपाटीवरचा LIVE VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुण्याच्या डेक्कन चौपाटीवर दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.हा राडा इतका भयंकर होता की यामध्ये एकमेकांना खूर्च्या फेकून मारल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या खुर्च्या नुसत्या मारल्या नाही आहेत, तर खूर्च्या तुटेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे.
Pune News : अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या डेक्कन चौपाटीवर दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.हा राडा इतका भयंकर होता की यामध्ये एकमेकांना खूर्च्या फेकून मारल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या खुर्च्या नुसत्या मारल्या नाही आहेत, तर खूर्च्या तुटेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत एकाच डोकं फुटलं आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
व्हिडिओ पाहिला असता खूर्च्यांची फेका फेक सूरू आहे. ही फेकाफेक इतकी जोरात सूरू आहे की खूर्च्या तुटल्या आहेत. तसेच या घटनेत एका व्यक्तीला टार्गेट करून त्याच्या डोक्यावर सतत खूर्च्या मारल्या आहेत. ज्यामुळे त्या व्यक्तीचे डोकं फुटलं होतं आणि तो रक्तबंबाळ झाला होता. या राड्याच्या काही मिनिटांनी घटनास्थळी पोलीस दाखल होतात आणि पिडीताला रूग्णालयात दाखल करतात तर आरोपींनाही घटनास्थळावरून अटक करतात असे संपूर्ण कॅमेरात कैद झाले आहे.
advertisement
पुण्याच्या डेक्कन चौपाटीवर दोन गटात तुंबळ हाणामारी pic.twitter.com/bd5UF1QxbJ
— News18Lokmat (@News18lokmat) October 14, 2025
खरं तर डेक्कन चौपाटी ही नदीपात्र परिसरामध्ये आहे. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत येथे पार्टी सूरू असते. रविवारी मध्यरात्री अशीच पार्टी सूरू होती.या पार्टी दरम्यान चौपाटीवर दारू पिण्यावरून दोन गटात तुफान राडा झाला होता. या राड्यातून दोन्ही गटांनी एकमेकांना खूर्च्या फेकून मारहाण करण्यात आली होती.यामध्ये एकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली होती.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.यावेळी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरूणांना ताब्यात घेतलं होतं. त्याचसोबत पीडीत व्यक्तीला उपचाराखातर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या प्रकरणात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना केली अटक आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 14, 2025 10:40 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या घातल्या, डोकं फुटेपर्यंत मारलं,पुण्यातील डेक्कन चौपाटीवरचा LIVE VIDEO