Jammu Kashmir : शोधून शोधून ठोकलं, पहलगामचा मास्टरमाईंड हुकला, 3 साथीदार यमसदनी, भारतीय लष्कराला मोठं यश

Last Updated:

Jammu Kashmir Terrorist Encounter : सुरक्षा दलांनी विशेष ऑपरेशन सुरू केले आहे. मंगळवारी (13 मे) सकाळी शोपियांच्या जंपाथरी परिसरात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना घेरलं. त्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर, सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात जोरदार कारवाई करत तीन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

file photo
file photo
जम्मू-काश्मीर : पहलगाममधील निर्घृण पर्यटक हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणारे ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. या कारवाईनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे.  या कारवाईत पहलगामच्या मास्टरमाईंडला मोठा धक्का बसला आहे.
शोपियानसह अनेक संवेदनशील भागांमध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी विशेष ऑपरेशन सुरू केले आहे. मंगळवारी (13 मे) सकाळी शोपियांच्या जंपाथरी परिसरात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना घेरलं. त्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर, सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात जोरदार कारवाई करत तीन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

पहलगाम हल्ल्याशी संबंध? लष्कराने दिली अपडेट...

पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध भारतीय सुरक्षा दलाकडून सुरू आहे. पहलागाममधील हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी अद्यापही काश्मीरमध्ये लपले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शोपियांनमध्ये ठार झालेले दहशतवादी हे पहलगाममधील दहशतवादी असल्याची चर्चा होती. मात्र, यावर लष्कराने स्पष्टीकरण दिले आहे.
advertisement
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेले दहशतवादी हे पहलगाम हल्ल्यात सहभागी नव्हते.पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र विशेष मोहीमा राबवल्या जात आहेत. आजच्या कारवाईत ठार करण्यात आलेले दहशतवादी हे पहलगाममधील दहशतवाद्यांचे जवळचे साथीदार असल्याची माहिती समोर आली आहे.  सुरक्षा दलाने पहलगामाच्या दहशतवाद्यांभोवती आपल्या कारवाईचा फास आता आणखी घट्ट केला आहे.
advertisement

पहलगाममधील दहशतवाद्यांवर बक्षीस...

दरम्यान, पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टर्स शोपियांच्या विविध भागांमध्ये लावण्यात आले आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या हल्ल्यात 22 एप्रिल रोजी 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर 14 जण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये एक नेपाळी नागरिक देखील होता.
advertisement
या भीषण हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (TRF) ने स्वीकारली होती. त्यामुळे आता तीन पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचा शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी पोस्टर्स लावून, जनतेलाही सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Jammu Kashmir : शोधून शोधून ठोकलं, पहलगामचा मास्टरमाईंड हुकला, 3 साथीदार यमसदनी, भारतीय लष्कराला मोठं यश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement