Manikarnika Ghat : '94' हा मृत्यूचा आकडा? मणिकर्णिका घाटावरील चितेवर का लिहिला जातो हा अंक? कारण समोर

Last Updated:

अनेक मृतदेहांवर पांढऱ्या रंगात ‘94’ हा अंक लिहिलेला असतो. हा आकडा पाहताच अनेकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो हा मृत्यूचा संकेत आहे का? किंवा हा मृत्यूचा आकडा आहे का?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सध्या देशभरात चर्चेत असलेला काशीतील मणिकर्णिका घाट पुन्हा एकदा लोकांच्या कुतूहलाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ, फोटो आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या कहाण्यांमुळे हा घाट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण या घाटाशी जोडलेलं एक रहस्य आजही अनेकांना विचार करायला भाग पाडतं…
रात्रंदिवस पेटलेली चिता, हवेत मिसळलेला धुराचा वास, मंत्रोच्चारांचा आवाज आणि शांततेत दडलेली एक वेगळीच भीती… मणिकर्णिका घाटावर पाऊल टाकताच अनेकांना गूढतेची जाणीव होते. हिंदू धर्मानुसार इथे अंत्यसंस्कार केल्यास थेट मोक्ष मिळतो, म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात. पण जर तुम्ही बारकाईने पाहिलंत, तर इथे आणखी एक गोष्ट तुमचं लक्ष वेधून घेईल…
advertisement
अनेक मृतदेहांवर पांढऱ्या रंगात ‘94’ हा अंक लिहिलेला असतो. हा आकडा पाहताच अनेकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो हा मृत्यूचा संकेत आहे का? किंवा हा मृत्यूचा आकडा आहे का? हा तेथील चितांवर का लिहिला जातो? याचं मृत्यूशी काय कारण? कोणतं गुप्त चिन्ह आहे का? की एखाद्या तांत्रिक प्रथेशी याचा संबंध आहे?
advertisement
काही लोकांचा समज आहे की हा अंक आत्म्याच्या प्रवासाशी जोडलेला आहे. काहींना वाटतं हा यमलोकाशी संबंधित संकेत आहे. त्यामुळे या आकड्याभोवती एक रहस्यमय वातावरण तयार होतं.
दाहसंस्कारापूर्वी दाहकर्ता लाकडाने शवावर 94 हा अंक लिहितो काही लोक चिता जळल्यानंतर त्याच्या राखेमध्ये राख पूर्णपणे थंड होण्यापूर्वी त्यामध्ये 94 हा आकडा लिहिला जातो. पण असं का? तर मान्यतेनुसार प्रत्येक मनुष्यात 94 गुण (मुक्ती मंत्र) असतात. हे गुण त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार वाढतात किंवा घटतात.
advertisement
पुराणानुसार, सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाने प्रत्येक व्यक्तीला सहा महत्त्वाचे गुण प्रदान केले होतो.. जो मनुष्य या सहाही गुणांनी परिपूर्ण असतो, त्याला सर्व सद्गुण म्हणजे 94 गुण आपोआप प्राप्त होतात. त्यामुळे, मणिकर्णिका घाटावर अंतिम संस्कार करताना हे 94 गुण शरीरास समर्पित केले जातात आणि त्यामुळे आत्म्याला मुक्ती आणि मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते.
advertisement
मणिकर्णिका घाट फक्त स्मशान नाही… तो मृत्यू आणि मोक्ष यांच्या मधली एक जिवंत सीमारेषा आहे. आणि म्हणूनच इथलं प्रत्येक चिन्ह, प्रत्येक प्रथा आणि प्रत्येक आकडा लोकांना आजही थरारून सोडतो.
view comments
मराठी बातम्या/देश/
Manikarnika Ghat : '94' हा मृत्यूचा आकडा? मणिकर्णिका घाटावरील चितेवर का लिहिला जातो हा अंक? कारण समोर
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement