दुलकर सलमान, पृथ्वीराज यांच्या घरांवर छापे; मोठे रॅकेट उघड, केरळच्या रस्त्यावरून फिरत होत्या ‘भूतान एक्सप्रेस’ गाड्या

Last Updated:

Luxury Cars Smuggled: केवळ भूतानच्या वापरासाठी असलेल्या लक्झरी गाड्या आयात शुल्क किंवा जीएसटी न भरता उघड्या सीमेवरून भारतात तस्करी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

News18
News18
कोच्ची: केरळमध्ये तब्बल शेकडो कोटींच्या करचोरीशी संबंधित प्रचंड लक्झरी कार स्मगलिंग रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. सीमाशुल्क (Customs) व मोटार वाहन विभागाने खुलासा केला की बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज, रेंज रोव्हर यांसारख्या महागड्या गाड्या भूतानमार्गे भारतात आणून बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या राज्यांत पुनर्नोंदणी केली जात होती.
advertisement
अधिकाऱ्यांनी सांगितले की- या टोळीची ‘मोडस ऑपरेंडी’ अशी होती की ते प्रीमियम कार भूतानमधून खास व्यापार करारांतर्गत सवलतीच्या शुल्कात आयात करत. या गाड्या केवळ भूतानात वापरण्यासाठी परवानगी असतानाही त्या गाड्या सीमारेषा ओलांडून बेकायदेशीररित्या भारतात आणल्या जात आणि त्यावर आयात शुल्क किंवा जीएसटी भरला जात नसे.
advertisement
भारतात आल्यानंतर या कार सुरुवातीला हिमाचल प्रदेश, सिक्कीम किंवा अरुणाचल प्रदेशासारख्या "शिथिल" नियम असलेल्या राज्यांत नोंदणी केल्या जात. जिथे रोड टॅक्स कमी आहे आणि तपासणी सैल आहे. त्यानंतर बनावट किंवा फेरफार केलेल्या कागदपत्रांवर केरळसह इतर राज्यांत पुनर्नोंदणी केली जात असे. काही प्रकरणांत खरी कार असलेल्या नोंदणी क्रमांकाची क्लोन करून वापर केली जात होती.
advertisement
ऑपरेशन...
या प्रकरणातऑपरेशन नुमखोरअंतर्गत मंगळवारी केरळमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. मल्याळम अभिनेते दुलकर सलमान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या घरांसह अनेक लक्झरी शो-रूम्सवर छापे घालण्यात आले.
advertisement
आत्तापर्यंत 36 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये दुलकर सलमानची दोन वाहने असून, त्यातील एक लँड रोव्हर डिफेंडर आहे.
वाहनमालकांना ज्यात सेलिब्रिटींचाही समावेश आहे सीमाशुल्क विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना वैध कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. कोणत्याही वाहनाचे कागद बनावट आढळल्यास ते जप्त केले जाणार असल्याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे.
advertisement
पडद्यामागचं रहस्य
स्रोतांच्या माहितीनुसार हे रॅकेट तीन प्रमुख मार्गांनी चालवले जात होते
-कंटेनरमधून थेट लक्झरी कार आणून.
-गाड्या वेगवेगळ्या भागांत वेगळ्या करून भागांच्या स्वरूपात आणून पुन्हा जोडून.
-पर्यटनाच्या नावाखाली गाड्या चालवत आणून त्या भारतातच सोडून देऊन.
advertisement
काही प्रकरणांत भारतीय सैन्य, भारतीय दूतावास आणि अगदी अमेरिकन दूतावासाची बनावट शिक्के वापरून गाड्या लपवण्यात आल्याचं उघड झालं आहे.
केरळमध्ये अशा सुमारे 150200 गाड्या असल्याचा अंदाज आहे. तर सध्या 15 प्रकरणे तपासाअंतर्गत आहेत. प्रत्येक गाडीवर दहा लाखांपासून कोट्यवधींपर्यंतच्या कराची चुकवणूक झाल्याने एकूण महसूल तोटा शेकडो कोटींमध्ये गेला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की खरेदीदार ज्यात अभिनेते, उद्योगपती, राजकारणी यांचा समावेश आहे, हे वाहन 3040 टक्के कमी किमतीत घेत होते. त्यापैकी अनेकांनी अज्ञान व्यक्त करत "कागदपत्रे खरी असल्याचं वाटलं" असा दावा केला आहे.
या रॅकेटचा मागोवा तामिळनाडूतील कोयंबतूरपर्यंत लागला आहे. एका अधिकाऱ्याच्या मते, ही अतिशय सुबक रचना असलेली ऑपरेशन चेन आहे. गाड्या अधिकृत आयात म्हणून नाही, तर आधीच देशांतर्गत नोंदणी झाल्या आहेत अशा स्वरूपात आणल्या जातात. त्यामुळे कर चुकवेगिरीचा मागोवा घेणं खूप कठीण होतं. सध्या धाडी सुरूच आहेत आणि तपास आणखी व्यापक होणार असल्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/देश/
दुलकर सलमान, पृथ्वीराज यांच्या घरांवर छापे; मोठे रॅकेट उघड, केरळच्या रस्त्यावरून फिरत होत्या ‘भूतान एक्सप्रेस’ गाड्या
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement