Chandrayaan-3: लँडर आणि रोव्हर पुन्हा जागा होऊ शकतो का? इस्रोच्या माजी अध्यक्षांची दिलं उत्तर

Last Updated:

"भारताच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेच्या संभाव्य समाप्तीचे हे संकेत आहेत.

चांद्रयान 3
चांद्रयान 3
बेंगळुरू: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान-3 मधील लँडर आणि रोव्हर मॉड्युल पुन्हा एकदा सक्रिय करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता लँडर आणि रोव्हर जागे होण्याची कोणतीही आशा राहिलेली नाही, अशी माहिती प्रख्यात अंतराळ शास्त्रज्ञांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले, "भारताच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेच्या संभाव्य समाप्तीचे हे संकेत आहेत.
स्पेस कमिशनचे सदस्य आणि इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार या मोहिमेशी सक्रियपणे संबंधित होते. ते पीटीआयला म्हणाले. "नाही, नाही, लँडर आणि रोव्हर पुनरुज्जीवित होण्याची आणखी आशा नाही. ते सक्रिय होणार असते तर आत्तापर्यंत झाले असते. आता अजिबात शक्यता नाही."
इस्रोनं 22 सप्टेंबर रोजी सांगितलं होतं की, चंद्रावर दिवस उगवल्यानंतर सौर उर्जेवर चालणाऱ्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरची स्थिती तपासण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद किंवा संकेत मिळालेले नाहीत. संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील.
advertisement
चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे 23 ऑगस्ट रोजी भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा जगातील पहिला देश बनला. यूएस, सोव्हिएत युनियन (रशिया) आणि चीननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट-लँडिंग करणारा भारत जगातील चौथा देश आहे.
बेंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेनं अनुक्रमे 4 आणि 2 सप्टेंबर रोजी चंद्रावर सूर्यास्त होण्यापूर्वी लँडर आणि रोव्हरला स्लीप मोडमध्ये ठेवलं होतं. 22 सप्टेंबरच्या सुमारास पुढील सूर्योदयाच्या वेळी ते जागृत होतील अशी आशा होती. लँडर आणि रोव्हर चंद्रावरील एका दिवसाच्या कालावधीत (पृथ्वीवरील सुमारे 14 दिवस) ऑपरेट करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत.
advertisement
इस्रोतील अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, चांद्रयान-3 मोहिमेची तिन्ही उद्दिष्टं पूर्ण झाली आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचं प्रात्यक्षिक, चंद्रावर फिरणाऱ्या रोव्हरचं प्रात्यक्षिक आणि पेलोड आणि लँडरच्या मदतीनं चंद्राच्या पृष्ठभागावर इन-सीटू वैज्ञानिक प्रयोग हाती घेणं ही तिन्ही उद्दिष्टं साध्य झाली आहेत.
चंद्रावर लँडिंग केल्यानंतर, लँडरमधील वैज्ञानिक पेलोड आणि 26-किलो वजनाच्या सहा-चाकी रोव्हरनं एकामागून एक प्रयोग केले जेणेकरुन ते पृथ्वीवरील 14 दिवसांत आत पूर्ण होतील. त्यानंतर ते चंद्रावरील गडद अंधार आणि अत्यंत थंड हवामानात राहिले.
advertisement
इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, जर लँडर आणि रोव्हरशी संपर्क पुन्हा स्थापन झाला तर तो बोनस असेल. आपलं नशीब चांगलं असेल तर लँडर आणि रोव्हर दोन्ही पुन्हा सक्रिय होतील. आपल्याला आणखी काही प्रायोगिक माहिती मिळेल. चंद्राच्या पृष्ठभागाची पुढील तपासणी करण्यासाठी हा डेटा उपयुक्त ठरेल.
4 सप्टेंबर रोजी इस्रोनं सांगितलं होतं की, विक्रम लँडरनं आपलं ध्येय साध्य केलं आहे. त्यानं ‘हॉप’ प्रयोग यशस्वीपणे पार पाडला. आपण दिलेल्या आदेशानुसार, त्यानं इंजिन सुरू केलं आणि अपेक्षेप्रमाणे सुमारे 40 सेंटिमीटर उडी मारली आणि 30 ते 40 सेमी अंतरावर पुन्हा सुरक्षितपणे उतरलं.
advertisement
हा 'किक-स्टार्ट' भविष्यातील 'सॅम्पल रिटर्न' आणि मानवी मोहिमांना प्रोत्साहित करेल. स्पेस एजन्सीनं 2 सप्टेंबर रोजी सांगितलं होतं की, रोव्हरनं आपली असाइनमेंट पूर्ण केली आहे. आणखी एक असाइनमेंटसाठी त्याच्या यशस्वी सक्रियतेची आशा आहे! नाहीतर ते भारताचा राजदूत म्हणून कायमचं चंद्रावर राहील.
advertisement
चांद्रयान-3 मोहीम पूर्ण झाल्याबद्दल किरण कुमार म्हणाले, ' या मोहिमेचा बृहद प्रमाणात विचार केला तर चंद्रावरील ज्या भागावर म्हणजे दक्षिण ध्रुवावर जिथं आजपर्यंत कुणीही पोहोचू शकलं नव्हतं तिथं आपण पोहोचलो आहोत आणि त्या भागाचा सीटू डाटा आपण मिळवला आहे हे निश्चितच मोठं यश आहे. आणि आपण मिळवलेली माहिती खरंच खूप उपयुक्त आहे. चंद्राच्या त्या भागातील भविष्यातील योजनांचं नियोजन करताना आणि ज्ञान अशा दोन्ही बाजूंनी आपण मिळवलेली माहिती फायद्याची ठरणार आहे.'
advertisement
चंद्रावर सँपल रिटर्न मोहीम हाती घेण्याच्या इस्त्रोच्या शक्यतेबद्दलही ते बोलले. पण, असा उपक्रम कधी हाती घेतला जाईल या बाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
कुमार म्हणाले, "होय, भविष्यात हे सर्व नक्कीच घडेल. कारण या सर्व तांत्रिक क्षमता विकसित करण्यात आल्या आहेत. या क्षमतेमुळे आता चंद्रावर सॉफ्ट-लँडिंग करता आलं आहे. अशाचप्रकारे भविष्यात तिथून साहित्य उचलून परतही आणता येईल. भविष्यात अशा मोहिमा नक्कीच हाती घेतल्या जातील."
ते म्हणाले, "भविष्यात, या पैकी अनेक गोष्टींवर काम होईल. योजना तयार केल्या जातील आणि त्यानंतर तंत्रज्ञानाच्या विकासाच्या सर्वांगीण दृष्टीच्या आधारे प्रस्ताव मांडले जातील. एकूण नियोजन कसं होईल आणि किती साधनं उपलब्ध केली जातील यावर हे पूर्णपणे अवलंबून आहे. त्यामुळे अगोदरच सर्व सांगणं फार कठीण आहे."
view comments
मराठी बातम्या/देश/
Chandrayaan-3: लँडर आणि रोव्हर पुन्हा जागा होऊ शकतो का? इस्रोच्या माजी अध्यक्षांची दिलं उत्तर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement