पंतप्रधानांनी वीर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आणि त्यांच्या शौर्यपूर्ण नेतृत्वाचे व स्वशासनासाठीच्या लढ्याचे गौरवपूर्ण स्मरण केले.
वीर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या महान राणीला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. साहस आणि युद्ध कौशल्याचे प्रतीक असलेल्या भारतातील सर्वात पराक्रमी योध्यांपैकी एक म्हणून त्यांचे स्मरण केले जाते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
राणी वेलू नचियार यांनी वसाहतवादी शोषणाविरुद्ध आवाज उठवला आणि भारतीयांच्या स्वशासनाच्या अधिकाराचा पुरस्कार केला, सुशासन आणि सांस्कृतिक अभिमानाबद्दलची त्यांची वचनबद्धता आजही देशाला प्रेरणा देत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. राणी वेलू नचियार यांचे बलिदान आणि दूरदर्शी नेतृत्व पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत राहील, भारताच्या प्रगतीच्या वाटचालीत त्यांचे कार्य शौर्य आणि देशभक्तीचा दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शक ठरेल, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
advertisement
या संदर्भात X या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी सामायिक केलेला संदेश :
राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. साहस आणि युद्ध कौशल्याचे प्रतीक असलेल्या भारतातील सर्वात पराक्रमी योध्यांपैकी एक म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. त्यांनी वसाहतवादी शोषणाविरुद्ध लढा दिला आणि भारतीयांच्या स्वशासनाच्या अधिकाराचा पुरस्कार केला. सुशासन आणि सांस्कृतिक अभिमानाबद्दलची त्यांनी वचनबद्धता अनुकरणीय आहे. त्यांचे बलिदान आणि दूरदर्शी नेतृत्व पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 8:37 PM IST











