दिल्लीतील ‘पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या’ प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी पंतप्रधानांचे आवाहन

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2026 रोजी राय पिथौरा सांस्कृतिक संकुलात ‘The Light & the Lotus: Relics of the Awakened One’ या पिप्रहवा अवशेषांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करतील.

News18
News18
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला  राय पिथौरा  सांस्कृतिक संकुलामधील ‘पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या’ भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. ‘द लाईट अँड द लोटस :रेलिक्स ऑफ द अवेकन वन (प्रकाश आणि कमळ : प्रबुद्धाचे अवशेष)’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे.
संस्कृती आणि बौद्ध धर्माबद्दल आदर असलेल्या सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, आणि पिप्रहवाचा पवित्र वारसा अनुभवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शतकाहून अधिक काळानंतर मायदेशी परत आणलेले पिप्रहवा अवशेष, या प्रदर्शनात एकत्र ठेवण्यात आले आहेत, तसेच नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय आणि कोलकाता येथील भारतीय संग्रहालयाच्या संग्रहात जतन केलेले पिप्रहवा येथील अस्सल अवशेष आणि पुरातत्वीय साहित्य देखील या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
advertisement
पंतप्रधान मोदी यांनी X वरील  पोस्टमध्ये म्हटले आहे:
“ हा दिवस इतिहास, संस्कृती आणि भगवान बुद्धांच्या आदर्शांनी प्रेरित लोकांसाठी विशेष दिवस आहे.
दिल्लीतील राय पिथौरा सांस्कृतिक संकुलामध्ये, सकाळी 11 वाजता, ‘The Light & the Lotus: Relics of the Awakened One’   या भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय  प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
advertisement
या प्रदर्शनात पाहता येईल: 
एका शतकाहून अधिक काळानंतर भारतात परत आणलेले पिप्रहवा अवशेष.
नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय आणि कोलकाता येथील भारतीय संग्रहालयाच्या संग्रहात जतन केलेले पिप्रहवा येथील अस्सल अवशेष आणि पुरातत्वीय साहित्य.”
“हे प्रदर्शन भगवान बुद्धांचे उदात्त विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अनुसरून आहे. आपली युवा पिढी आणि आपली समृद्ध संस्कृती यांच्यातील बंध आणखी दृढ करण्याचा हा एक प्रयत्नही आहे. हे अवशेष मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाची मी प्रशंसा करतो.”
view comments
मराठी बातम्या/देश/
दिल्लीतील ‘पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या’ प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी पंतप्रधानांचे आवाहन
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement