राहुल गांधी घेणार 22 मुलांना 'दत्तक', पाकिस्तानच्या गोळीबारात पालकांना गमावलेल्या मुलांना मदतीचा हात!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rahul Gandhi to adopt 22 children : विरोधी पक्षनेते राहुल गांधी पूंछ जिल्ह्यातील 22 मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार आहेत. जम्मू-काश्मीर काँग्रेसचे नेते तारिक हमीद कर्रा यांनी याची माहिती दिली.
Rahul Gandhi adopt Orphan children : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पाकिस्तानच्या गोळीबारात आपले पालक गमावलेल्या जम्मू-काश्मीरमधील २२ मुलांचे 'पालकत्व' स्वीकारण्याचा (त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा) निर्णय घेतला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान झालेल्या हल्ल्यात आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित गोळीबारात या मुलांनी आपले आई-वडील गमावले होते.
22 मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार
जम्मू-काश्मीर काँग्रेसचे नेते तारिक हमीद कर्रा यांच्या माहितीनुसार, राहुल गांधी पूंछ जिल्ह्यातील या 22 मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार आहेत, ज्यांनी आपले दोन्ही पालक किंवा कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती गमावली आहे. पूंछ हे सीमेपलीकडील गोळीबाराने सर्वाधिक प्रभावित झालेल्या शहरांपैकी एक आहे.
advertisement
मे महिन्यात राहुल गांधींनी पूंछला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी स्थानिक पक्ष नेत्यांना बाधित मुलांची यादी तयार करण्यास सांगितले होते. त्यानंतर एक सर्वेक्षण करण्यात आले आणि सरकारी नोंदी तपासल्यानंतर मुलांची नावे निश्चित करण्यात आली. या मदतीचा पहिला हप्ता बुधवारी (29 जुलै) जारी होण्याची शक्यता आहे, जेणेकरून मुलांना त्यांचे शिक्षण सुरू ठेवता येईल.
advertisement
This will make your day
Rahul Gandhi ‘adopts’ 22 children who lost their parents in Pakistani shelling during Op Sindoor
This is beyond politics, beautiful gesture. Mad respect for RaGa pic.twitter.com/qlGGbBM5Fp
— Ankit Mayank (@mr_mayank) July 29, 2025
advertisement
राहुल गांधींनी यापूर्वी पूंछमधील एका पब्लिक स्कूलला भेट दिली होती आणि काही विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. ज्यांमध्ये उर्बा फातिमा आणि झैन अली यांसारख्या पीडित मुलांचा समावेश होता. "मला खूप वाईट वाटतंय, तुमचा खूप अभिमान आहे. मला तुमची आठवण येते, मित्रांनो. मला थोडी भीती वाटतेय, पण काळजी करू नका. सर्व काही सामान्य होईल. तुमचा प्रतिसाद असाच असायला हवा, तुम्ही खूप अभ्यास करायला हवा आणि शाळेत खूप मित्र बनवायला हवेत," असे ते मुलांना म्हणाले होते.
Location :
Delhi
First Published :
July 29, 2025 12:02 PM IST
मराठी बातम्या/देश/
राहुल गांधी घेणार 22 मुलांना 'दत्तक', पाकिस्तानच्या गोळीबारात पालकांना गमावलेल्या मुलांना मदतीचा हात!