Indore Couple Missing: एक चूक अन् सोनमचा खेळ खल्लास, पोलिसांना टीप मिळाली अन् सगळी लिंक लागली
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Indore Couple Missing Update: इंदूर येथून मेघालयातील शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम यांच्या प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे.
इंदूर येथून मेघालयातील शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम यांच्या प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर १७ दिवस बेपत्ता असलेल्या सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आली. सोनमसोबतच मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या इतर ३ आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. अन्य एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. राजाची हत्या करण्यापूर्वी झालेली एक चूक सोनमला चांगलीच महागात पडली. यामुळं सगळं प्रकरण उघडकीस आलं.
मेघालयचे डीजीपी आय नोंनगरंग यांनी सांगितले की, राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. मावलाखियातच्या एका टुरिस्ट गाईडने आधीच दावा केला होता की २३ मे रोजी बेपत्ता होण्यापूर्वी या जोडप्यासोबत तीन अज्ञात पुरुषही होते. गाईडच्या जबाबानंतर या प्रकरणाने नवं वळण घेतलं. गाईडने दिलेल्या टीपमुळे पोलिसांना सगळी लिंक लागली.
advertisement
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनीही या प्रकरणाबद्दल ट्विट केले. त्यांनी लिहिले आहे की इंदूरच्या राजा हत्याकांडात मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील 3 मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. महिलेने आत्मसमर्पण केले आहे आणि दुसऱ्या आरोपीला पकडण्याची मोहीम अजूनही सुरू आहे.
एक चूक आणि सोनमचं बिंग फुटलं
राजा आणि सोनम लग्नानंतर हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. त्यानंतर 23 मे रोजी दोघं बेपत्ता झाले. 2 जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीत सापडला, तर त्याच्या पत्नीचा शोध सुरू होता. मावलाखियात येथील टुरिस्ट गाईट अल्बर्ट पीडी यांनी सांगितले की, 23 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांनी या जोडप्याला तीन इतर पुरुष पर्यटकांसह नोंगरियात ते मावलाखियात येथे 3000 हून अधिक पायऱ्या चढताना पाहिले होते.
advertisement
त्यांनी आदल्या दिवशी नोंगरियात येथे नेण्यासाठी त्यांना गाईडची मदत करण्याची ऑफर दिली होती. परंतु त्यांनी नकार दिला. त्यांनी दुसरा गाईड निवडला. ते चार पुरुष पुढे चालत होते, तर महिला मागे होती. ते चार पुरुष हिंदीत बोलत होते, परंतु ते काय म्हणत आहेत ते मला समजले नाही, कारण मला फक्त खासी आणि इंग्रजी येत आहे, असंही त्या गाईडने सांगितलं. गाईडसमोर घडलेला हा प्रकार सोनमला महागात पडला. येथूनच खरी लिंक मिळाली आणि सोनमभोवती अटकेचा फास आवळला गेला.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
June 09, 2025 9:20 AM IST
मराठी बातम्या/देश/
Indore Couple Missing: एक चूक अन् सोनमचा खेळ खल्लास, पोलिसांना टीप मिळाली अन् सगळी लिंक लागली