'ती फक्त माझी...', एक पोस्ट अन् घरात सापडला सतीशचा मृतदेह, Love स्टोरीचा हादरवणारा शेवट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
'ती फक्त माझी आहे, तिचं दुसऱ्या कुणासोबतही लग्न होऊ शकत नाही', सतीशने इन्स्टाग्रामवर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत हे कॅप्शन लिहून फोटो पोस्ट केला, पण याच पोस्टने सतीशच्या लव्ह स्टोरीचा हादरवून टाकणारा शेवट झाला आहे.
'ती फक्त माझी आहे, तिचं दुसऱ्या कुणासोबतही लग्न होऊ शकत नाही', सतीशने इन्स्टाग्रामवर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत हे कॅप्शन लिहून फोटो पोस्ट केला, पण याच पोस्टने सतीशच्या लव्ह स्टोरीचा हादरवून टाकणारा शेवट झाला आहे. ही पोस्ट केल्यानंतर काही वेळातच सतीशचा मृतदेह त्याच्या घरामध्ये सापडला आहे. सतीशच्या या पोस्टने आगीत इंधन टाकण्याचं काम केलं. सतीशची ही पोस्ट पाहून त्याच्या गर्लफ्रेंडच्या कुटुंबातील सदस्य संतापले आणि थेट सतीशच्या घरात घुसले. मुलीच्या कुटुंबाने सतीशला लाठ्याकाठ्यांनी मारलं. या हल्ल्यात सतीश गंभीर जखमी होऊन कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
ड्रायव्हर म्हणून काम करणारा सतीश गावातल्या मुलीच्याच प्रेमात पडला. या दोघांची प्रेम कहाणी सर्वसामन्य जोडप्यासारखीच सुरू झाली आणि दोघांनी भविष्याची स्वप्न रंगवायला सुरूवात केली, पण गावातील रुढीवादी परंपरांमुळे दोघांमधल्या नात्यात नवा ट्विस्ट आला.
मुलीच्या कुटुंबाला जेव्हा हे नाते कळाले तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. मुलीचं कुटुंब सतीशला भेटलं आणि हे नातं संपवायला सांगितलं. तसंच कुटुंबाने मुलीच्या लग्नासाठी आपल्याच समाजाचा आणि आर्थिक स्थैर्य असलेला मुलगा बघायलाही सुरूवात केली, पण तरीही सतीश आणि त्याची गर्लफ्रेंड एकमेकांच्या संपर्कात होते. गर्लफ्रेंडच्या घरचे तिच्या लग्नासाठी मुलगा बघत आहेत, हे समजताच सतीशने सोशल मीडियावर त्याचं प्रेम जाहीर केलं, आणि यातूनच सतीशची हत्या करण्यात आली आहे.
advertisement
याप्रकरणी पोलिसांनी वीरंजी, विनाजी आणि जनालू या तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सतीशची हत्या केल्यानंतर हे तिघेही फरार झाले आहेत, त्यामुळे पोलिसांकडून तिघांचाही शोध सुरू आहे. तेलंगणाच्या जगतियाल जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे आसपासच्या परिसरात खळबळ माजली आहे.
Location :
Jagtial,Karimnagar,Telangana
First Published :
October 03, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/देश/
'ती फक्त माझी...', एक पोस्ट अन् घरात सापडला सतीशचा मृतदेह, Love स्टोरीचा हादरवणारा शेवट!