शीना बोरा हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट, पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीचं नाव गायब, CBI ने कोर्टात काय सांगितलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sheena Bora Murder Case Updates : शीना बोरा हत्याकांड प्रकरणात साक्षीदारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या 65 जणांच्या नावांची यादी सीबीआयने गुरूवारी विशेष न्यायालयात सादर केली आहे.
Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्याकांड खटला आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने वगळलेल्या 65 साक्षीदारांची नावे सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर सीबीआयने ती यादी न्यायालयात सादर केली आहे. या यादीत पीटर मुखर्जी यांची पूर्वाश्रमीची पत्नी शबनम सिंग यांचाही समावेश आहे. सरकारी वकिलांनी शबनम सिंग यांचे नाव साक्षीदारांच्या यादीतून वगळल्याने अनेकांनी भूवया उंचावल्या आहेत.
125 साक्षीदारांची अंतिम यादी
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी असून, तिचा माजी पती पीटर मुखर्जी या प्रकरणात सहआरोपी आहे. यापूर्वी मार्च महिन्यात सीबीआयने 125 साक्षीदारांची अंतिम यादी विशेष न्यायालयात सादर केली होती. या यादीत इंद्राणीची मुलगी विधी मुखर्जी, इंद्राणीचा आधीचा पती आणि सहआरोपी संजीव खन्ना यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी, शबनम सिंग, शीनाच्या मैत्रिणी संजना फुकम रक्तीम आणि प्रणामी गोस्वामी यांचा समावेश होता.
advertisement
सरकारी वकिलांनी यादीतून वगळलं
आता मात्र, सरकारी वकिलांनी शबनम सिंग यांचे नाव साक्षीदारांच्या यादीतून वगळले आहे, ज्यामुळे या खटल्याला नवीन वळण मिळाले आहे. या वगळण्यात आलेल्या साक्षीदारांमुळे खटल्याच्या पुढील सुनावणीत काय घडामोडी होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरा पती संजीव खन्ना यांची मुलगी विधी मुखर्जी हिचा समावेश होता. संजीव खन्ना देखील या प्रकरणी सहआरोपी आहे. विधीसह या यादीत तपासात सहभागी असलेले पोलिस अधिकारी, शीनाचे मित्र संजना फुकन रक्तिम आणि प्रणमी गोस्वामी यांचा समावेश होता.
advertisement
शीना बोरा हत्या प्रकरण काय?
एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली. आरोपानुसार, इंद्राणी मुखर्जी, तिचा आधीचा पती संजीव खन्ना आणि इंद्राणीचा चालक श्यामवर राय यांनी शीनाचा गळा दाबून खून केला. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो रायगडजवळील एका जंगलात नेण्यात आला आणि तिथे जाळून पुरण्यात आला, असा आरोप सीबीआयने केला आहे. तीन वर्षांनंतर, ऑगस्ट 2015 मध्ये, चालक श्यामवर राय याला एका वेगळ्या प्रकरणात (शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली) अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने शीना बोरा हत्याकांडाचे रहस्य उघड केले. श्यामवर रायच्या माहितीनंतर इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांना ऑगस्ट २०१५ मध्ये अटक करण्यात आली. पीटर मुखर्जीला तीन महिन्यांनंतर अटक करण्यात आली. इंद्राणी मुखर्जी मुख्य आरोपी आहे, तर तिचा माजी पती पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना सह-आरोपी आहेत. या हत्येमागे आर्थिक व्यवहार, कौटुंबिक वाद आणि शीनाचे पीटर मुखर्जीच्या मुलासोबतचे नाते (राहुल मुखर्जी, जो शीनाचा सावत्र भाऊ होता) अशी अनेक कारणे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
Location :
Delhi
First Published :
May 23, 2025 9:39 AM IST
मराठी बातम्या/देश/
शीना बोरा हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट, पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीचं नाव गायब, CBI ने कोर्टात काय सांगितलं?