'वडिलांचे माझ्या पत्नीसोबत संबध', मुलाचे DGP बापावर खळबळजनक आरोप, नंतर सापडला मृतदेह!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
माझ्या वडिलांचे माझ्या पत्नीसोबत अवैध संबंध आहेत... माजी डीजीपीच्या मुलाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला, त्यानंतर या मुलाचा त्याच्याच निवासस्थानी गूढ अवस्थेमध्ये मृतदेह सापडला आहे.
पंचकुला : माझ्या वडिलांचे माझ्या पत्नीसोबत अवैध संबंध आहेत... माजी डीजीपीच्या मुलाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला, त्यानंतर या मुलाचा त्याच्याच निवासस्थानी गूढ अवस्थेमध्ये मृतदेह सापडला आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी ही सत्य घटना आहे, ज्यामुळे राजकीय आणि पोलीस दलात खळबळ माजली आहे. पंजाबचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) मोहम्मद मुस्तफा आणि पंजाबच्याच माजी मंत्री रझिया सुलताना यांचा मुलगा अकील अख्तर याचा मृतदेह त्याच्या घरात सापडला, यानंतर पोलिसांनी मोहम्मद मुस्तफा आणि रझिया सुलताना यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अकील अख्तर हा त्याच्या घरी बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळला होता, यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. सुरूवातीला त्याचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झाला, असा अंदाज व्यक्त केला गेला, पण सोशल मीडियावरच्या व्हिडिओमुळे याप्रकरणाला धक्कादायक वळण लागलं.
अकील अख्तरचा हा व्हिडिओ ऑगस्ट महिन्यात रेकॉर्ड करण्यात आला होता. ज्यात त्याने वडील आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे आरोप केले, तसंच आई आणि बहीण आपल्याला मारण्याचा किंवा खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा अकीलने केला. मी खूप तणावात असून मला काय करायचं, हे कळत नाहीये, असंही अकील या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.
advertisement
Aqil Akhtar son of Ex- DGP Mustafa serious allegations on his own family. Astonished to listen to the allegations levelled by Aqil. pic.twitter.com/LAvvy3u6Ng
— Akashdeep Thind (@thind_akashdeep) October 18, 2025
पत्नी अन् वडिलांवर आरोप
'लग्नाच्या पहिल्या रात्री तिने मला स्पर्श करू दिला नाही. तिने माझ्याशी नाही तर माझ्या वडिलांशी लग्न केलं. मी व्यवस्थित आहे, पण तरीही मला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं, मी व्यसनाधीन नाही, मग मला तिथे का पाठवलं गेलं? मी जर मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हतो, तर मला डॉक्टरकडे नेलं पाहिजे होतं. कुटुंबाने माझे पैसेही हिसकावून घेतले आहेत', असं अकील या व्हिडिओमध्ये म्हणत आहे.
advertisement
चार जणांविरोधात गुन्हा
दरम्यान याप्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी अकीलचे वडील, त्याची आई यांच्यासह एकूण 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अकीलचा मोबाईल, त्याच्या सोशल मीडिया पोस्ट तपासल्या जातील. अकीलच्या व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Panchkula,Haryana
First Published :
October 21, 2025 10:31 PM IST
मराठी बातम्या/देश/
'वडिलांचे माझ्या पत्नीसोबत संबध', मुलाचे DGP बापावर खळबळजनक आरोप, नंतर सापडला मृतदेह!