Train accident: रक्ताच्या चिळकांड्या, शरीराचे तुकडे तुकडे; पौर्णिमेचं स्नान करायला गेलेल्या 8 जणांना ट्रेननं चिरडलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Train accident: उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या चुनार रेल्वे स्टेशनवर कार्तिक पौर्णिमेला काळका एक्सप्रेसच्या धडकेत ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात शोक आणि तणावाचे वातावरण.
मालगाडीवर मेमो ट्रेन धडकून 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली. पौर्णिमेच्या स्नानासाठी निघालेल्या 8 जणांवर काळानं घाला घातला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्यास 8 लोकांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या, मृतदेहाचे अक्षरश: तुकडे झाले. ओळखही पटणं कठीण झालं आणि हाहाकार उडाला. आरडाओरडा सुरू झाला. काही कळण्याच्या आतच ८ जणांचे मृतदेह पडले.
घटना कधी घडली?
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजताच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली. कालका एक्सप्रेसच्या धडकेत रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या सात ते आठ भाविकांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी चुनार गंगा घाटावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
advertisement
शॉर्टकट ठरला काळ
रेल्वे स्टेशनच्या जवळून गंगा घाटाकडे जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून अनेक भाविक रेल्वे ट्रॅक ओलांडत होते. ट्रॅक पार करत असतानाच, अचानक वेगात आलेली काळका एक्सप्रेस आली आणि या भाविकांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रेनच्या धडकेने अनेक भाविक गंभीर जखमी झाले, तर सात ते आठ भाविक ट्रेनखाली चिरडले गेले. त्यांची ट्रेनने कापली जाऊन जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी मोठी अफरातफरी आणि गोंधळ निर्माण झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, मृतदेहांचे अक्षरशः तुकडे झाले होते, ज्यामुळे दृश्य हृदय हेलावणारे होते.
advertisement
चिंधड्या झाल्या ओळख पटवणंही कठीण
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल आणि शासकीय रेल्वे पोलीसचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. जवानांनी रेल्वे ट्रॅकवरून मृतांचे अवयव आणि अवशेष बाजूला केले. अपघातामुळे रेल्वे ट्रॅकवर मृतदेहांचे झालेले तुकडे पोलिसांनी समूहित केले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे चुनार रेल्वे स्टेशन परिसरात आणि गंगा घाटावर शोकाकुल आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवित्र कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
रेल्वे रुळ क्रॉस करु नका, पोलिसांचं आवाहन
view commentsरेल्वे प्रशासनाच्या वतीने या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे ट्रॅक ओलांडणे हे कायदेशीररित्या गुन्हा असूनही, भाविकांनी मोठी गर्दी असताना आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एक किंवा फूट ओव्हर ब्रिजचा वापर न करता ट्रॅकवरून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. रेल्वे पोलिसांनी स्थानिक नागरिकांना आणि भाविकांना रेल्वे ट्रॅक ओलांडणे किती धोकादायक आहे, याबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
November 05, 2025 10:39 AM IST
मराठी बातम्या/देश/
Train accident: रक्ताच्या चिळकांड्या, शरीराचे तुकडे तुकडे; पौर्णिमेचं स्नान करायला गेलेल्या 8 जणांना ट्रेननं चिरडलं


