भारतात लँड झालेल्या टॉप सिक्रेट विमानावर मोठी अपडेट, आता तोडल्या शिवाय पर्याय नाही; 'लगान' वसूल होणार

Last Updated:

UK F-35B Fighter Jet: अब्जोंच्या किंमतीचं यूकेचं F-35B लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे तिरुवनंतपुरम विमानतळावर अडकून पडलं आहे. आता हे विमान दुरुस्त करता न आल्यामुळे विघटित करून परत नेण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे.

News18
News18
तिरुवनंतपुरम: केरळमधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकलेले ब्रिटनचे अत्याधुनिक F-35B लढाऊ विमान तेथेच दुरुस्त करता येणार नसल्याची माहिती उच्च सरकारी सूत्रांनी CNN-News18 ला दिली आहे. यामुळे हे विमान आता विघटित करून हलवावे लागणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, ब्रिटिश नौदल आता एक मोठं विमान पाठवून या लढाऊ विमानाचे सुटे भाग परत घेणार आहे. भारताकडून वापरलेल्या पार्किंग आणि हँगर चार्जेससह सर्व खर्च ब्रिटन भरून काढणार असल्याचेही सांगण्यात आले.
हायड्रॉलिक आणि स्टार्टिंग सिस्टममध्ये बिघाड
या लढाऊ विमानाच्या हायड्रॉलिक प्रणालीत बिघाड झाला होता. जो नंतर स्टार्टिंग सिस्टमपर्यंत पोहोचला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणते भाग विघटित केले जातील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ब्रिटनमधून एक तांत्रिक टीम लवकरच भारतात येणार आहे.
advertisement
14 जूनच्या रात्री आपत्कालीन लँडिंग
हे F-35B लढाऊ विमान 14 जूनच्या रात्री तांत्रिक अडचणीमुळे केरळमधील त्रिवेंद्रम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं होतं. त्यानंतर तेथेच ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत उभं आहे.
‘MRO’ युनिटमध्ये हलवण्याचा निर्णय
एएनआय वृत्तसंस्थेने याआधी एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं होतं की, ब्रिटनने या विमानाला त्रिवेंद्रम विमानतळावरच असलेल्या ‘Maintenance, Repair, and Overhaul (MRO)’ युनिटमध्ये हलवण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. UK इंजिनिअरिंग टीम आवश्यक उपकरणांसह आल्यावर विमान हँगरमध्ये हलवण्यात येईल असेही सांगण्यात आले.
advertisement
सुरक्षा उपायांवर भर
ब्रिटिश उच्चायुक्तालयाने एका निवेदनात सांगितले की, भारतीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जमिनीवरील सुरक्षा उपाय पाळले जात आहेत. विमानाच्या दुरुस्त्या आणि तपासणी दरम्यान पूर्ण काळजी घेतली जाईल.
हवामानामुळे विमान परत जाऊ शकले नाही
F-35B हे लढाऊ विमान प्रत्यक्षात HMS Prince of Wales या ब्रिटिश विमानवाहू युद्धनौकेकडे परत जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे ते शक्य झाले नाही. सुरक्षा लक्षात घेता विमानाने भारताच्या त्रिवेंद्रम विमानतळावर वळसा घालून सुरक्षितपणे लँडिंग केले.
advertisement
त्यानंतर जमिनीवर असतानाच यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान पुन्हा उड्डाण करू शकले नाही. HMS Prince of Wales वरील अभियंत्यांनी पाहणी करून ब्रिटनमधून तांत्रिक मदतीची आवश्यकता असल्याचे ठरवले.
मराठी बातम्या/देश/
भारतात लँड झालेल्या टॉप सिक्रेट विमानावर मोठी अपडेट, आता तोडल्या शिवाय पर्याय नाही; 'लगान' वसूल होणार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement