अमेरिकेत शिक्षणासाठी अर्ज करताय? तपासलं जाणार तुमचं सोशल मीडिया, काय आहे नवा आदेश
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अमेरिकेने 'नो एंट्री' धोरण लागू करत एफ, एम आणि जे वीजा मुलाखती स्थगित केल्या आहेत, ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.
अमेरिकेत शिक्षण घेण्याची तयारी करत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. अमेरिकेने ‘नो एंट्री’ धोरण लागू करत एफ, एम आणि जे प्रकारच्या वीजा मुलाखती तात्काळ स्थगित केल्या आहेत. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न अधूरं राहण्याची शक्यता आहे. ‘द गार्जियन’च्या माहितीनुसार, मंगळवारी अमेरिकेच्या सरकारकडून दूतावासांना एक स्पष्ट संदेश पाठवण्यात आला. या संदेशात पुढील सूचना मिळेपर्यंत कोणत्याही नवीन एफ (विद्यार्थी), एम (व्यावसायिक अभ्यासक्रम) किंवा जे (एक्सचेंज प्रोग्राम) वीजा मुलाखती घेऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ट्रम्प प्रशासनाचा अचानक निर्णय
हे धोरण डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने अचानक घेतले असून, यामागे ‘राष्ट्रीय सुरक्षेची चिंता’ असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांच्या वीजा अर्जावर आता अधिक काटेकोरपणे आणि संशयाच्या दृष्टीने तपासणी केली जाणार आहे.
सोशल मीडियावर लक्ष
नवीन वीजा प्रक्रियेनुसार, अर्जदारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. Instagram, TikTok, Twitter यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट, लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स तपासले जातील. कोणतीही संशयास्पद कृती आढळल्यास वीजा नाकारला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
अमेरिकेत दरवर्षी लाखो परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. एकट्या भारतातूनच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तिकडे उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असतात. मात्र या निर्णयामुळे वीजा प्रक्रिया अनिश्चित बनली आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे.
अमेरिकी विद्यापीठांनाही फटका
NAFSA Association च्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये अमेरिकेत सुमारे १० लाख आंतरराष्ट्रीय विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुमारे 43.8 बिलियन डॉलर्सचे योगदान दिले. आता वीजा प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे हे विद्यापीठ आर्थिक संकटात सापडू शकतात.
advertisement
काय पुढे होणार?
अमेरिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी इतर देशांचा विचार करण्याची शक्यता आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश याकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. मात्र अमेरिका हे अजूनही सर्वोत्तम शैक्षणिक गंतव्य मानले जाते, त्यामुळे या बंदीला लवकरच शिथिलता मिळेल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 28, 2025 2:25 PM IST