Operation Bunyan ul Marsoos : पाकिस्तानच्या टार्गेटवर दिल्ली, पाच शहरांवर हल्ले, शत्रूचं 'ऑपरेशन बुनयान उल मारसूस' काय आहे?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India Pakistan Operation Bunyan ul Marsoos : भारताकडून सतत होणाऱ्या चिथावणीला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान उल मारसूस सुरू केल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.
Operation Bunyan ul Marsoos : ऑपरेशन सिंदूरमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने नापाक खुरापती सुरू केल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने रावळपिंडीसह तीन पाकिस्तानी हवाई तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. अशातच भारताने पाकिस्तानचा हा नापाक कट हाणून पाडलाय. पाकिस्तानने या ऑपरेशनला बुनयान उल मारसूस (Operation Bunyan ul Marsoos) असं नाव दिलं आहे. पण बुनयान उल मारसूस आहे तरी काय? जाणून घ्या.
पाकिस्तानचा खेळ खल्लास
पाकिस्तानच्या लष्कराच्या मीडिया विंगच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने संपूर्ण भारतात "अनेक लक्ष्यांवर" हल्ले सुरू केले आहेत. या ऑपरेशनमध्ये संपूर्ण भारतात अनेक लक्ष्यांवर लक्ष ठेवले जात आहे, असं पाकिस्तानी मीडियामध्ये सांगितलं जात आहे. मात्र, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत.
ऑपरेशन बुनयान उल मारसूस आहे काय?
advertisement
भारताकडून सतत होणाऱ्या चिथावणीला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान उल मारसूस सुरू केल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. ऑपरेशन बुनयान उल मारसूस याचा अर्थ 'स्टीलची मजबूत भिंत' असा होतो. शुक्रवारी भारताने पाकिस्तानमधील तीन हवाई तळांवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू असल्याचे पाकिस्तानच्या सरकारी टेलिव्हिजनने म्हटलं आहे. पण पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळतीये.
advertisement
भारतातील 26 ठिकाणी ड्रोन हल्ले
ऑपरेशन बुनयान उल मारसूसच्या नावाखाली पाकिस्तानने नवी दिल्ली, जम्मू, अमृतसर, पठाणकोट आणि जालंधर या शहरांवर हल्ले करण्याचा प्लॅन आखला होता. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला सहजरित्या हाणून पाडलाय. भारताने पाकिस्तानविरोधात इस्लामाबाद, लाहोर आणि रावळपिंडीतील हवाई तळांवर हल्ले केले. पाकिस्तानने भारतातील 26 ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते. भारतीय दलांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली.
advertisement
जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील (आयबी) भारतीय शहरांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तर देत आहे.
Location :
Delhi
First Published :
May 10, 2025 6:54 AM IST
मराठी बातम्या/देश/
Operation Bunyan ul Marsoos : पाकिस्तानच्या टार्गेटवर दिल्ली, पाच शहरांवर हल्ले, शत्रूचं 'ऑपरेशन बुनयान उल मारसूस' काय आहे?