AUS vs ENG Ashes : बेझबॉलची 'राख' झाली! ऑस्ट्रेलियाकडून 10 वर्षांची बादशाहत कायम, इंग्लंडला सलग तिसऱ्यांदा चारली धूळ
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Australia Wins Ashes Series : सुरुवातीला असं वाटत होतं की इंग्लंडची टीम या दबावाखाली लवकरच ऑल आऊट होईल, परंतु इंग्लिश फलंदाजांनी मैदानात जिद्दीने लढा दिला.
AUS Wins Ashes Series : अॅडिलेटवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाहुण्या इंग्लंडसमोर विजयासाठी 435 रन्सचे डोंगरासारखे लक्ष ठेवलं होतं. पण इंग्लंडचा संघ 352 धावांवर ऑलआऊट झाला अन् चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने सामना जिंकून मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाची गेल्या 10 वर्षाची बादशाहत कायम राहिली आहे. तर इंग्लंडला पुन्हा धक्का बसलाय.
सुरुवातीला असं वाटत होतं की इंग्लंडची टीम या दबावाखाली लवकरच ऑल आऊट होईल, परंतु इंग्लिश फलंदाजांनी मैदानात जिद्दीने लढा दिला. मॅच शेवटच्या सत्रापर्यंत रंगतदार अवस्थेत पोहोचली होती आणि एक वेळ अशी आली होती की इंग्लंड हे लक्ष गाठून चमत्कार करेल असे वाटू लागले. मात्र, विल जॅक्स चांगल्या फॉर्मात खेळत असतानाच बाद झाला आणि तिथूनच मॅचचे चित्र पूर्णपणे बदललं.
advertisement
जॅक्स बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी जोरदार पुनरागमन केले आणि इंग्लंडचा डाव विखुरला. अखेर ऑस्ट्रेलियाने 82 रन्सने विजय मिळवत या ऍडलेड टेस्टसह मानाच्या ॲशेस सीरीजवर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 371 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 286 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 349 धावा करून इंग्लंडसमोर 435 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा डाव 352 धावांवर आटोपला.
advertisement
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीने पहिल्या डावात 106 धावांची खेळी केली. तर बेन्स स्टोक्सने पहिल्या डावात 83 डावांची झुंजार खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात ट्रेव्हिस हेड इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरला. तर दुसऱ्या डावात देखील अॅलेक्स कॅरीने अर्धशतक झळकावलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 9:48 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
AUS vs ENG Ashes : बेझबॉलची 'राख' झाली! ऑस्ट्रेलियाकडून 10 वर्षांची बादशाहत कायम, इंग्लंडला सलग तिसऱ्यांदा चारली धूळ











