Maharashtra Election 2024 : महायुतीत 18 जागांवर वाद, मुंबईसह आणखी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तिढा

Last Updated:

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. महायुतीत १८ ते २० जागांवर घोळ अद्याप मिटलेला नाही.

News18
News18
राहुल झोरी, प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत भाजप आणि शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. यात भाजपने ९९ तर शिवसेनेनं ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर अजित पवार यांनी काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. दरम्यान, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही. महायुतीत १८ ते २० जागांवर घोळ अद्याप मिटलेला नाही. जागावाटपाचा तिढा कायम असून बंड होऊ नये यासाठी महायुतीकडून सावध पवित्रा घेण्यात आला आहे.
advertisement
शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधील जागांचा तिढा अद्याप कायम आहे. काही जागांवर वेट ॲंड वॉचची भूमिका महायुतीने घेतली आहे. तर काही जागांवर महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार असणार त्यावर उमेदवार निवड ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईतील ८ जागांवर पेच असून उर्वरित महाराष्ट्रात काही जागांवरील तिढा सुटलेला नाही.
कोणत्या जागांवर पेच कायम आहे ?
advertisement
मुंबई :
अंधेरी पूर्व - भाजप आणि शिवसेना दोघांचाही दावा
चेंबूर - शिंदेंचा दावा मात्र भाजप देखील मागत आहे
दिंडोशी - भाजप आणि शिवसेनेकडून दावा
कलिना - शिवसेना, भाजप दावा
वरळी - शिवसेना, भाजपचा दावा
वर्सोवा - भाजप आणि सेना दोघांचाही दावा
शिवडी - सेना आणि भाजप
धारावी - शिवसेनेचा दावा मात्र भाजपची देखील मागणी - गेल्या वेळेस भाजपनं लढली होती
advertisement
ठाणे - मिरा भाईंदर - गीता जैन - भाजपच्या नरेंद्र मेहता देखील इच्छुक
कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर - मुन्ना महाडिक यांच्या मुलासाठी कृष्णराज महाडिकसाठी भाजपचा दावा तर शिवसेनेकडून राजेश श्रीरसागर इच्छुक
सिंधुदुर्ग - कुडाळ विधानसभा - आता शिवसेनेकडेच राहणार
रत्नागिरी - गुहागर - शिवसेना आणि भाजपकडूनही जोरदार तयारी
सोलापूर
- करमाळा - अपक्ष संजय शिंदे - मात्र भाजपकडून उमेदवार देण्याची तयारी
advertisement
- बार्शी - अपक्ष उमेदवार - भाजप दावा
अहमदनगर - कोपरगाव - अजित पवार गट - स्नेहलता कोल्हे पाटील दावा (भाजप)
परभणी - गंगाखेड - रासपकडे असलेल्या जागेवर भाजप लढण्याची शक्यता
नांदेड - लोहा - प्रतापराव चिखलीकरांसाठी भाजपचा दावा
अमरावती - बडनेरा (अपक्ष) - भाजपच्या उमेदवाराकडून देखील मागणी
अकोला - बाळापूर - भाजपच्या माजी आमदारांकडून मागणी - भाजपचा दावा
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/Maharashtra Assembly Elections/
Maharashtra Election 2024 : महायुतीत 18 जागांवर वाद, मुंबईसह आणखी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तिढा
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement