Crime: छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, राजकीय वातावरण तापलं!

Last Updated:

छत्तीसगडच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या एका ब्लॉक कमिटी कार्यकारिणी सदस्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.

News18
News18
रायपूर: छत्तीसगडच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या एका ब्लॉक कमिटी कार्यकारिणी सदस्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.
छत्तीसगड राज्यातील सारंगड बिलाईगड जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. हरिनाथ पटेल असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव होता, त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोकाकळा पसरली. पटेल यांच्या हत्येची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली आहे. सारंगड बिलाईगड गावातील सिंगापूर या गावात रस्त्याच्या कडेला पटेल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.
advertisement
घटनाक्रम:
मंगळवारी संध्याकाळी ते कामानिमित्त घराबाहेर पडले मात्र परत येताना वाटेत हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. बरमकेला येथील पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पटेल यांच्या हत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, पोलीस तपासातून या हत्येबाबतच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे.
पटेल हे छत्तीसगडमधील काँग्रेसच्या एका ब्लॉक कमिटीच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. त्यांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये ते सक्रिय होते. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याच्या बातमीने परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येमागे आरोपींचा काय हेतू होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एकापेक्षा जास्त व्यक्तींनी मिळून पटेल यांच्यावर हल्ला केला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे, मात्र त्यामागील कारण काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पोलीस सध्या पटेल यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करुन या प्रकरणी अधिक माहिती घेत आहेत.
advertisement
मंगळवारी संध्याकाळी पटेल हे घरातून निघाले. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. मंगळवारी रात्री रस्त्याकडेला त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन केलेल्या पाहणीमध्ये पटेल यांच्यावर धारदार शस्त्र चालवून त्यांची हत्या केल्याचं स्पष्ट दिसत आहे. ते कमरीद या गावचे रहिवासी होते. त्यांच्या गावी या बातमीनंतर शोकाचं वातावरण आहे. पोलिसांनी या हत्येचा तातडीने तपास करावा आणि आरोपींना शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Crime: छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, राजकीय वातावरण तापलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement