Russia Ukraine War: धाकधूक वाढली, रशियन सैन्यात भरती झालेल्या 16 भारतीय बेपत्ता; आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू

Last Updated:

Russia Ukraine war: युक्रेन विरुद्ध सुरू असलेल्या युद्धात रशियाच्या सैन्यात असलेले 16 भारतीय नागरीक बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. या युद्धात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: रशियन सैन्यात भरती होऊन युक्रेन युद्धात सामील झालेल्या 16 भारतीय नागरिकांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे समोर आले आहे. तर या युद्धात आतापर्यंत 12 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी दिली.
केरळचा रहिवासी असलेल्या बिनील बाबू या भारतीय व्यक्तीचा युक्रेनमधील संघर्षात मृत्यू झाला आहे. तर जैन टी. के. नावाचा दुसरा भारतीय नागरिक जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीचे मॉस्कोमध्ये उपचार सुरू असून उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतात परत आणले जाणार आहे.
advertisement
रशियन सैन्यात भरती झालेल्या भारतीय नागरिकांची स्थिती
  • रशियन सैन्यात भरती झालेले भारतीय नागरिक- 126
  • नागरिक भारतात परतले- 96
  • मृत्यू झालेले भारतीय -12
  • सध्या रशियन सैन्यात कार्यरत भारतीय - 18
  • भारतीयांचा ठावठिकाणा माहिती नाही अशा लोकांना रशियाने त्यांना बेपत्ता या गटात टाकले असून अशा भारतीय नागरिकांची संख्या 16 इतकी आहे.
MEA प्रवक्ते रंधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियामध्ये कार्यरत राहिलेल्या भारतीय नागरिकांच्या लवकर सुटकेची मागणी भारताने पुन्हा केली आहे. केरळमधील बिनील बाबू यांच्या मृत्यूसंदर्भातही भारतीय दूतावास रशियन अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे, तसेच त्यांच्या पार्थिव अवशेषांच्या भारतात परतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
रशियन सैन्याने भारतीय नागरिकांना फसवले
बिनील (32) आणि जैन (27) हे दोघे आयटीआय यांत्रिक डिप्लोमा धारक होते आणि ते 4 एप्रिल रोजी रशियात इलेक्ट्रिशियन आणि नळकामगार म्हणून काम मिळवण्यासाठी गेले होते. मात्र, रशियात पोहोचताच त्यांचे भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि त्यांना रशियन सैन्याच्या सहाय्यक सेवेत युद्धक्षेत्रात पाठवण्यात आले.काही एजंटांनी नोकरी आणि रशियन पासपोर्टच्या आमिषाने भारतीय नागरिकांना फसवून रशियन सैन्यात भरती केल्याचे वृत्त आहे. मागील वर्षी मे महिन्यात यासंदर्भात चार मानवतस्करांना अटक करण्यात आली होती.
advertisement
जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाला भेट दिली तेव्हा अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भारतीय नागरिकांची रशियन सैन्यातून लवकर सुटका करण्याची मागणी केली होती. यानंतर रशियाने भारतीय नागरिकांना लवकर मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय, भारताने रशियन सैन्याकडून कोणत्याही नवीन भारतीय नागरिकांची भरती होऊ नये याची खात्री करण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या/ बातम्या/विदेश/
Russia Ukraine War: धाकधूक वाढली, रशियन सैन्यात भरती झालेल्या 16 भारतीय बेपत्ता; आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement