मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? संभाव्य संघात नाव पण विराटशी बोलणार कोण?

Last Updated:

Virat Kohli News: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघातील क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.

News18
News18
मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर सर्वांची नजर आहे ती टीम इंडियाच्या फलंदाजांवर होय. भारताच्या फलंदाजांची कामगिरी अतिशय खराब झाल्याने ऑस्ट्रेलियात संघाचा पराभव झाला. यात सर्वाधिक चर्चा झाली ती कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या फलंदाजीची होय. आता फॉर्म परत मिळवण्यासाठी या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे अशी चर्चा सुरू झाली आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टार झालेल्या या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगणार तरी कोण?
विराट कोहली रणजी ट्रॉफीत खेळणार का? असा प्रश्न विचारायची हिंमत दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या (DDCA) अधिकाऱ्यांना होत नाही. कोहलीचं नाव दिल्ली रणजी संघाच्या संभाव्य खेळाडूंमध्ये आहे. पण तो गेल्या 13 वर्षांपासून स्थानिक क्रिकेट खेळलेले नाहीत.अशा परिस्थितीत DDCAचे अधिकारी अध्यक्ष रोहन जेटली आणि कोहलीचे प्रशिक्षक राहिलेले राजकुमार शर्मा यांच्याकडून काही उत्तर मिळते का याची वाट पाहत आहेत.
advertisement
घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या कसोटी मालिकेतील मोठ्या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्टार खेळाडूंना स्थानिक क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर भारतीय संघातील विकेटकीपर ऋषभ पंत, ओपनर यशस्वी जायसवाल आणि शुभमन गिल यांसह अनेक स्टार खेळाडू रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी तयार आहेत. कर्णधार रोहित शर्मा देखील रणजी संघाबरोबर सराव करत आहेत.
advertisement
टीम इंडियाला मिळाला नवा कोच, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी BCCIचा धाडसी निर्णय
कोहलीचं नाव दिल्ली संघाने 2012 नंतरही संभाव्य खेळाडूंमध्ये ठेवले आहे. पण संघाच्या ड्रेसिंग रूमपर्यंत तो पोहोचला नाही. कोहलीचे प्रशिक्षक राहिलेले राजकुमार शर्मा सध्या दिल्लीच्या बाहेर आहेत ते परत आल्यावर कोहलीशी संपर्क करतील आणि त्यांचा निर्णय सांगतील. DDCA अध्यक्ष रोहन जेटली सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहेत. तर विराट कोहली सध्या मुंबईत आहेत. जर विराट दिल्ली संघाकडून खेळण्यास तयार झाले तर ते 30 जानेवारीपासून रेल्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात दिल्लीकडून खेळताना दिसू शकतात.मात्र या सामन्याचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही.
advertisement
विराटने रणजी का खेळावी?
1. विराट कोहली न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका फ्लॉप ठरला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत त्याने 23.75 च्या सरासरीने फक्त 190 धावा केल्या. तर न्यूझीलंडविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांत 15.50 च्या सरासरीने केवळ 93 धावा केल्या. या दोन्ही मालिकांमध्ये विराट सतत ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर झेलबाद झाल्याचे दिसले. त्यामुळेच अनेक माजी फलंदाजांनी त्यांना रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! शिपाई ते IAS अधिकारी प्रत्येकाची सॅलरी किती होणार?
2. BGT मालिकेत पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितले की, भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंनी वेळोवेळी रणजीसह इतर स्थानिक सामने खेळणे गरजेचे आहे. ज्यामुळे फलंदाजी कौशल्य सुधारणा होईल.
3. गेल्या आठवड्यात मुंबईतील BCCI मुख्यालयात भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत न्यूझीलंडविरुद्धची होम सिरीज आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीचे पुनरावलोकन करण्यात आले. बैठकीदरम्यान बोर्डाच्या सदस्यांनी वरिष्ठ खेळाडूंनी स्थानिक क्रिकेट खेळण्यावर भर दिला. याशिवाय खेळाडूंना रणजी खेळणे अनिवार्य करण्यात आले होते.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? संभाव्य संघात नाव पण विराटशी बोलणार कोण?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement