Pakistan BLA Attack: अशांत पाकिस्तानात हादरले, BLAच्या ‘फतेह दस्ते’चा पाक लष्करावर आत्मघाती हल्ला; 90 सैनिक ठार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Pakistan BLA Attack: बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी सैन्यावर भीषण हल्ला केला आहे. नोशकी येथील आरसीडी हायवेवर फिदायीन हल्ल्यात किमान 90 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बलुचिस्तान: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) मोठा हल्ला करत पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले. रविवारी झालेल्या या हल्ल्यात किमान 90 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, पाकिस्तानी सैन्याने याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. पण स्थानिक पोलिस प्रमुख जफर जमानानी यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 सुरक्षा अधिकारी ठार झाले आणि १० जण जखमी झाले. BLA ट्रेन हायजॅक केल्यानंतर गेल्या 12 तासात पाकिस्तानमध्ये 19 हल्ले झाले आहेत.
उद्ध्वस्त
बीएलएच्या मजीद ब्रिगेडने आत्मघाती हल्ला करत पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर बीएलएच्या ‘फतेह दस्ते’ने आणखी हल्ला केला, ज्यामुळे मृत सैनिकांची संख्या 90 झाली. हा ताफा 8 बसांमधून क्वेटाहून ताफ्तानकडे जात होता, त्यावेळी नोशकी येथील आरसीडी हायवेवर हा हल्ला झाला.
वर्ल्ड क्रिकेटमधील रेकॉर्ड; सचिनने जे केलं, ते आजवर कोणीच करू शकलं नाही
बीएलएचे प्रवक्ते जीयंद बलोच यांनी निवेदन देत सांगितले की, या हल्ल्यासाठी विस्फोटकांनी भरलेले वाहन (VBIED) वापरण्यात आले. ताफ्यातील एका बसला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले, तर दुसऱ्या बसमधील सर्व सैनिकांना ‘फतेह दस्ते’ने ठार मारले." हल्ल्याची जबाबदारी बीएलएने स्वीकारली असून, लवकरच अधिक माहिती जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
advertisement
हल्ल्यानंतर तातडीची मदतकार्य सुरू
हल्ल्यानंतर तातडीने तीन पाकिस्तानी हेलिकॉप्टर नोशकी येथे पाठवण्यात आले. तसेच, सर्व रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आली असून, एफसी मुख्यालयाकडे रुग्णवाहिका धावत आहेत.
एका आठवड्यात दुसरा मोठा हल्ला
बलुचिस्तान प्रांतात एका आठवड्यात बीएलएचा हा दुसरा मोठा हल्ला आहे. याआधी मंगळवारी बलुच बंडखोरांनी बोलान परिसरात जाफर एक्सप्रेस ट्रेन पळवली होती. या घटनेनंतर तब्बल ३० तास सुरक्षा दल आणि बंडखोरांमध्ये संघर्ष सुरू होता.
advertisement
पाकिस्तानी सैन्याने या घटनेत ३०० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याचा दावा केला आहे. तसेच, या मोहिमेत ३३ बंडखोर ठार झाल्याचे सैन्याने सांगितले. मात्र, बीएलएने २१४ प्रवाशांना ठार मारल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 16, 2025 2:56 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Pakistan BLA Attack: अशांत पाकिस्तानात हादरले, BLAच्या ‘फतेह दस्ते’चा पाक लष्करावर आत्मघाती हल्ला; 90 सैनिक ठार


