Jemimah Rodrigues : वडिलांवर गंभीर आरोप, लेकीने गर्वाने मान उंचावली! सेमीफानयल जिंकवल्यावर गळ्यात पडून ढसाढसा रडली जेमिमा! पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Jemimah Rodrigues Father : टीम इंडियाला सेमीफायनल सामना जिंकवल्यावर आई-वडिलांना मिठी मारतानाचा जेमिमाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
India Into the Final of Womens CWC 2025 : टीम इंडियाची स्टार क्रिकेटर जेमिमा रोड्रिग्जने वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिला. डिफेंडिंग चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध धडाकेबाज शतक ठोकत तिने इतिहास रचला आणि टीम इंडियाला तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचलं. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कंगारू संघाने प्रथम बॅटिंग करताना 49.5 ओव्हरमध्ये 338 रन केले होते. याला उत्तर देताना, भारतीय संघाने 48.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या बदल्यात 341 रन करून ही मॅच जिंकली आणि वर्ल्ड कपच्या इतिहासातील हा सर्वात मोठा यशस्वी रन चेस ठरला. यामध्ये जेमिमा रोड्रिग्ज मॅचविनिंग खेळी केली.
जेमिमाची 127 रनची शानदार खेळी
जेमिमा रोड्रिग्जने वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक ऐतिहासिक आणि धडाकेबाज शतक ठोकलं. तिने 134 बॉलमध्ये नाबाद 127 रनची शानदार खेळी केली, ज्यामध्ये 14 फोरचा समावेश होता. तिने कर्णधार हरमनप्रीत कौर (89 रन) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 167 रनची मोलाची भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाला विजयाच्या जवळ जाता आलं. जेमिमाने अखेरपर्यंत मैदान सोडलं नाही. तिने कांगारूंना झुंजावलं. मात्र, मॅच जिंकल्यावर ती भावूक झाली. कुटुंबाला फ्लाईंग किस दिली अन् वडिलांच्या गळ्यात पडून रडली.
advertisement
पाहा Video
advertisement
धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचे आरोप
मुंबईतील सर्वात जुन्या क्लबपैकी एक असलेल्या खार जिमखानाने जेमिमाह रॉड्रिग्जचे सदस्यत्व रद्द केलं होतं. क्लबच्या काही सदस्यांनी जेमिमाह रॉड्रिग्जचे वडील इव्हान (Jemimah Rodrigues Father) यांच्यावर आरोप केले होते. जेमिमाहचे वडील इव्हान क्लबच्या जागेचा वापर धार्मिक कार्यक्रमांसाठी करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली. धार्मिक कार्यक्रमात धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते, ज्यावर त्यांनी आक्षेप घेतला. या वादाने जेमिमाला मानसिक त्रास झाला होता. त्यानंतर ती टीम इंडियामधून ड्रॉप देखील झाली होती.
advertisement
जेमिमाची वर्ल्ड कपमधील कामगिरी
दरम्यान, जेमिमाने या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलपूर्वी फारशी चांगली बॅटिंग केली नव्हती. तिने न्यूझीलंडविरुद्ध फक्त एकच फिफ्टी प्लस स्कोर केला होता. या वर्ल्ड कपमध्ये तिचे स्कोर 0, 32, 0, 33, 76* आणि 127* असे आहेत. मात्र, तिचे काम अजून पूर्ण झालेले नाही. आता तिच्यावर टीमला साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये विजय मिळवून देण्याची जबाबदारी आहे. वर्ल्ड कप नॉकआऊट रन-चेजमध्ये शतक ठोकणारी ती दुसरी बॅटर ठरली आहे. यापूर्वी इंग्लंडच्या नट-सायव्हर ब्रंटने 2022 च्या फायनलमध्ये नॉट आऊट 148 धावा अशी कामगिरी केली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 7:15 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Jemimah Rodrigues : वडिलांवर गंभीर आरोप, लेकीने गर्वाने मान उंचावली! सेमीफानयल जिंकवल्यावर गळ्यात पडून ढसाढसा रडली जेमिमा! पाहा Video


