NHAI ची स्मार्ट चाल! टोल वाचवायचा मार्ग आता मोबाईल अॅपवर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नं एक ऍप तयार केला आहे, ज्यामुळे आता टोल वाचवण्याचा प्रश्न सुटणार आहे.
मुंबई : आजच्या डिजिटल युगात सगळ्याच गोष्टी फोनवर केल्या जातात. मग ती मिटिंग असोत, ऑफिसचं काम किंवा मग आणखी काही... घर किंवा कुठेबी बसल्या बसल्या तुम्ही फोनमधून काम करु शकता आणि माहिती मिळवू शकता. आता हेच बघा ना स्मार्टफोनमध्ये गुगलमॅप आल्यामुळे लोकांना एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जाणं सोपं झालं, त्यामुळे रस्ता सापडण्यात मदत होते, शिवाय पर्यायी रस्ते देखील गुगल मॅपवर मिळतात.
पण यात एक गोष्टीची कमी होती ती म्हणजे कोणत्या रस्त्यावर किती टोल लागेल. एकंदरीत काय तर कोणता रस्ता निवडला त्यावर कमी पैसे टोलसाठी जातील हे कळणं थोडं कठीण होत, पण आता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नं एक ऍप तयार केला आहे, ज्यामुळे तुमचा हा प्रश्न देखील सुटणार आहे.
advertisement
NHAI च्या 'राजमार्ग यात्रा' अॅपमध्ये आता एक नवे फीचर जोडले जात आहे, जे विशेषतः हायवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
हा अॅप कसा काम करेल?
या अॅपमध्ये आता लवकरच 'Lowest Toll Route' म्हणजेच सर्वात कमी टोल लागणारा रस्ता शोधण्याची सुविधा मिळणार आहे. उदाहरणार्थ, जर कोणी दिल्लीहून लखनऊकडे जात असेल, तर आता अॅप तुम्हाला यमुना एक्सप्रेसवे, गाझियाबाद-अलिगढ-कानपूर रूट किंवा मुरादाबाद-बरेली-सीतापूर रूट या तिन्ही रस्त्यांची टोल फी तुलना करून दाखवेल आणि सगळ्यात स्वस्त रस्ता कोणता आहे, हे स्पष्टपणे सांगेल.
advertisement
'राजमार्ग यात्रा' अॅप म्हणजे काय?
हे अॅप 2023 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. या अॅपवरून वापरकर्त्यांना टोल प्लाझा, टॉयलेट्स, पेट्रोल पंप, रेस्ट एरिया, मेडिकल मदत, कॅफे इत्यादीची माहिती रिअल टाइममध्ये मिळते. आता त्यात 'Lowest Toll Route' हे नवे फीचर जोडले जात असल्याने, प्रवासाचे नियोजन करताना खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
advertisement
ही सुविधा विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल जे दररोज हायवेवर प्रवास करतात. प्रत्येक टोल प्लाझावर थांबणे आणि वेगवेगळ्या दराने पैसे भरणे हे सगळं टाळता येणार आहे. अॅप वापरून आपण आधीच कळवून घेऊ शकतो की कोणत्या मार्गावर सर्वात कमी टोल लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 28, 2025 4:58 PM IST