Ratan Tata passes away at 86: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी वाहिली श्रद्धांजली

Last Updated:

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शोक व्यक्त केला आहे. देशासाठी आणि देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी आणि दुःखी आहे.

रतन टाटा (ज्येष्ठ उद्योगपती)
रतन टाटा (ज्येष्ठ उद्योगपती)
मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शोक व्यक्त केला आहे. देशासाठी आणि देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी आणि दुःखी आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने फक्त टाटा ग्रुपला नव्हे तर प्रत्येक भारतीयाला मोठा तोटा झाला आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने मी एक वैयक्तिक मित्र देखील गमावला आहे. त्यांच्या प्रत्येक भेटीनंतर मला वेगळीच प्रेरणा आणि ऊर्जा मिळत गेली. त्यामुळे त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या नैतिक मूल्यांवरील माझा आदरही द्विगुणीत होत गेला.
advertisement
अत्यंत दूरदृष्टीचे उद्योजक आणि समाजसेवी असलेले रतन टाटा नेहमीच समाजाच्या भल्यासाठी धडपडत होते. रतन टाटा यांच्या जाण्याने देशाने आपला एक सहृदयी पुत्र गमावला आहे. रतन टाटा यांनी भारताचे नाव साऱ्या जगात नेले आणि साऱ्या जगातील जे जे सर्वोत्तम ते ते भारतात आणले. त्यांनी १९९१ मध्ये टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर समूहाला किमान 70 पटीने वाढवले.
advertisement
रिलायन्स उद्योग समूह, नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबीयांतर्फे रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत असून टाटा कुटुंबिय आणि टाटा समूह यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रतनजी तुमच्या स्मृती नेहमीच माझ्या हृदयात कायम राहतील.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Ratan Tata passes away at 86: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी वाहिली श्रद्धांजली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement