Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचा UPSC बाबत मोठा दावा, प्रकरणात नवं ट्विस्ट
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या अपात्रतेला आव्हान दिलं आहे. यूपीएससीच्या अपात्रेला आव्हान देताना पूजा खेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पुणे प्रतिनिधी : बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीकडून देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या अपात्रतेला आव्हान दिलं आहे. यूपीएससीच्या अपात्रेला आव्हान देताना पूजा खेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'मला अपात्र ठरविण्याचा अधिकारी यूपीएससीला नाही' असा दावा पूजा खेडकर यांनी न्यायालयात केला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात यूपीएससीकडून दाखल करण्यात आलेल्या उत्तरावर पूजा खेडकर यांनी म्हटलं की, एकदा प्रोबेशनर म्हणून निवड झाल्यानंतर आणि नियुक्ती केल्यानंतर यूपीएससीला अपात्र ठरवण्याचा अधिकारी नाही, अखिल भारतीय सेवा कायदा 1944 आणि सीएसई 2022 च्या नियम 19 नुसार कार्मिक आणि प्रशिक्षण विभागच कारवाई करू शकतो असा युक्तिवाद पूजा खेडकर यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
नेमकं काय आहे प्रकरण?
पूजा खेडकर यांची युपीएससी अंतर्गत ट्रेनी आयएएस म्हणून पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी आपल्या खासगी ऑडी गाडीला अंबर दिवा लावल्यामुळे तसचे विविध कारणांमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर पूजा खेडकर यांच्या प्रकरणात अनेक धक्कादाक खुलासे समोर आले. त्यांनी अनेकदा नावामध्ये बदल करून देखील युपीएससीची परीक्षा दिल्याचं समोर आलं. त्यानंतर युपीएससीनं त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अपात्र ठरवलं आहे. आता याविरोधात खेडकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
Aug 29, 2024 9:44 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचा UPSC बाबत मोठा दावा, प्रकरणात नवं ट्विस्ट










