Rahul Gandhi: राहुल गांधींचा आणखी एक धमाका, चक्क 'मृत' मतदारांसोबत 'चाय पे चर्चा'

Last Updated:

राहुल गांधी यांनी मतदार यादीमध्ये ज्या मतदारांना मृत दाखवण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत प्रत्यक्षात चहा घेतला आहे.

News18
News18
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
नवी दिल्ली :  काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केल्यामुळे एकच धुरळा उडवून दिला. राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग आरोपीच्या कटघऱ्यात उभं आहे. आता तर त्यांनी आणखी गोष्ट समोर आली आहे. राहुल गांधी यांनी मृत मतदारांसोबत चहापान केल्याबद्दलचे फोटो समोर आणले आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया हँडलवर ट्विट करून एकच खळबळ उडवून दिली आहे. राहुल गांधी यांनी मतदार यादीमध्ये ज्या मतदारांना मृत दाखवण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत प्रत्यक्षात चहा घेतला आहे.  "जीवनात अनेक प्रकारचे अनुभव येतात काही गोड, काही कडू, तर काही अगदी हसवणारे. पण मृत व्यक्तींसोबत बसून चहा पिण्याचा अनुभव? हे तर चित्रपटातील गोष्ट वाटते. मात्र हा प्रसंग घडलाय अगदी प्रत्यक्षात, आणि त्याचं श्रेय जातं... थेट निवडणूक आयोगाला' असं म्हणत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला टोला लगावला.
advertisement
तसंच, 'मतदार यादीतील गोंधळ आणि चुकीच्या नोंदींमुळे अनेक मृत व्यक्ती अजूनही 'जिवंत मतदार' म्हणून नोंदवले गेले होते. एका जनजागृती कार्यक्रमात, चहा-पानाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि उपस्थितांच्या यादीत हे मृत मतदार देखील नोंदले गेले. आयोजकांनी यादीप्रमाणे निमंत्रण पाठवलं, आणि मग सुरू झाला हा आगळावेगळा किस्सा ‘चहा पार्टी विथ घोस्ट गेस्ट्स’, असंही राहुल गांधींनी सांगितलं.
advertisement
तसंच, 'स्थानिक रहिवाशांनी हा प्रकार सोशल मीडियावर टाकताच तो व्हायरल झाला. लोकांनी निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त करताना हा प्रकार विनोदाच्या पद्धतीनेही मांडला. आता, निवडणूक आयोगाने या गोंधळाची दखल घेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. पण तोपर्यंत, हा ‘भूतिया चहा अनुभव’ लोकांच्या आठवणीत कायम राहणार, हे नक्की." असा टोलाही ही राहुल गांधींनी लगावला.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Rahul Gandhi: राहुल गांधींचा आणखी एक धमाका, चक्क 'मृत' मतदारांसोबत 'चाय पे चर्चा'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement