पावसाचा कहर! सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट, कोयनेतून वाढला पाण्याचा विसर्ग; सांगलीला बसणार फटका? 

Last Updated:

सोमवारी सकाळापासून जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाटण, कराड, जावळी, वाई, सातारा आणि महाबळेश्वर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात... 

Satara rain update
Satara rain update
सातारा : सोमवारी सकाळापासून जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाटण, कराड, जावळी, वाई, सातारा आणि महाबळेश्वर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसाचा जोर इतका आहे की, कोयना धरणात 65000 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे मागच्या 24 तासांत चौथ्यांदा विसर्गात वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर धरणाचे सर्व दरवाजे 8 फूटांनी उघडून 53 हजार 300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सांगली जिल्ह्याला बसणार फटका
कोयना नदीवरील तांबवे, निसरे हे बंधारे आणि संगमनगरचा धक्का पूल व मूळगावचा पूलही पाण्याखाली गेलेला आहे. कोयना धरणात सध्या 99 टीएमसी पाणीसाठा आहे. हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्याला 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. पाऊस असा कोसळत राहिला तर कोयना नदीच्या काठच्या गावाना जबरदस्त फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: नदीकाठच्या गावांनाही त्याचा फटका बसणार आहे. कृष्णा अन् कोयना नदीच्या पाण्यामुळे सांगली जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
advertisement
आणखी टप्प्याटप्प्यात पाण्याची विसर्ग होणार
कोयना धरण व्यवस्थापकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात पाऊस जोरदार झाल्यामुळे सोमवारी दुपारी धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फूटांवरून 3 फूट आणि रात्री 8 वाजता 5 फूटांवर उचलले. रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे 7 फूटांवर दरवाजे उचलण्यात आले. त्यामधून प्रतिसेकंद 44 हजार 800 आणि वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्यूसक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पावसाची आवक जशी वाढले, तसतसे पूर्वेकडे टप्याटप्यात ज्यादा पाणी सोडण्यात येणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पावसाचा कहर! सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट, कोयनेतून वाढला पाण्याचा विसर्ग; सांगलीला बसणार फटका? 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement