पाणीच पाणी! साताऱ्यातील धरणे 85% भरली, वर्षभराच्या पाण्याची झाली सोय, शेतकरी आनंदात!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सातारा जिल्ह्यात 15 मे पासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोयना, धोम, धोम बलकवडी, कण्हेरे, उरमोडी आणि तारळीसह सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोयना...
सातारा : जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत, ज्यामुळे सर्वच धरणांत मुबलक पाणीसाठा झाला आहे. कोयना, धोम, धोम बलकवडी, कण्हेरे, उरमोडी व तारळीसह जिल्ह्यातील अन्य प्रमुख प्रकल्पांतील पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून, शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाची दमदार हजेरी आणि धरणांची सद्यस्थिती
जिल्ह्यात 15 मे पासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे, ज्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सततच्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता, ज्यामुळे काही ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली होती. मात्र, आता धरणांत मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
प्रमुख धरणांमधील सद्यस्थिती (पाणीसाठा टीएमसीमध्ये आणि टक्केवारी)
- कोयना धरण : 87.020 टीएमसी (82.68% भरले). धरणात 5,261क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
- धोम धरण: 12.450 टीएमसी (92.22% भरले). धरणात 1,188 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
- धोम बलकवडी धरण: 3.650 टीएमसी (89.46% भरले). धरणात 502 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
- कण्हेर धरण: 9.370 टीएमसी (92.77% भरले). धरणात 1,099 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
- उरमोडी धरण: 9.260 टीएमसी (92.97% भरले). या धरणात 1,075 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे.
- तारळी धरण: 5.080 टीएमसी (86.84% भरले). धरणात 1,162 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे.
advertisement
मध्यम प्रकल्पांची स्थिती
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी आणि नागेवाडी धरणात 100 टक्के पाणीसाठा झालेला आहे. तर, मोरणा (69.77%), उत्तरमांड (69.19%), महू (80.55%), हातेघर (47.60%) आणि वांग-मराठवाडी (73.68%) या धरणांमध्येही चांगला पाणीसाठा झाला आहे. या समाधानकारक पाणीसाठ्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा वर्षभर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
advertisement
हे ही वाचा : कोल्हापूरची चिंता मिटली! 17 धरणे तुडुंब भरली; उन्हाळ्यात पाण्याची समस्या सुटली; पण धाकधूक कायम!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 9:42 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पाणीच पाणी! साताऱ्यातील धरणे 85% भरली, वर्षभराच्या पाण्याची झाली सोय, शेतकरी आनंदात!