पाण्याची चिंता मिटली! उजनी धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर; 'या' 4 जिल्ह्यांना मोठा दिलासा
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सोलापूर, पुणे, नगर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असलेले उजनी धरण ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यंदा उन्हाळ्यात...
पंढरपूर (सोलापूर) : सोलापूरसह पुणे, नगर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी वरदायिनी असणारे उजनी धरण आज (बुधवार) 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी रात्री हे 117 टीएमसीचे धरण 98 टक्के भरले असून, पुढील एक-दोन दिवसांत ते पूर्ण क्षमतेने भरेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे. यासोबतच उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याचीही चिंता आता राहिलेली नाही.
उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाईची आठवण
यंदाच्या उन्हाळ्यात धरणाच्या पातळीने तळ गाठला होता आणि धरण उणे साठ्यापर्यंत (negative storage) गेले होते. यामुळे सोलापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर झाला होता. उन्हाळ्यात सोलापूरकरांना तब्बल आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळत होते. इतर छोट्या-मोठ्या गावांच्या पाणी योजनाही कोरड्या पडल्या होत्या आणि शेतीसाठीच्या पाण्याचीही तीच अवस्था होती. परंतु, यंदा पावसाने मे महिन्यापासूनच धो-धो बरसण्यास सुरुवात केली. जून आणि जुलै महिन्यात सोलापूर जिल्ह्यात कधी नव्हे ते चक्क पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
advertisement
ऑगस्टमध्येच उजनी धरणाने गाठली शंभरी
ज्या काळात सोलापूर जिल्ह्याचे डोळे पावसाकडे लागलेले असायचे, त्याच काळात पुरेसा पाऊस होऊन धरणातही पुरेसा पाणीसाठा झाला. पुणे परिसरात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. यामुळे उजनी धरणावरील इतर छोट्या धरणांमध्येही पाणीसाठा वाढला आणि तेथून मोठ्या प्रमाणात पाणी उजनीत आले. त्यामुळेच हे धरण यंदा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात 100 टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
advertisement
उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर शहर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, माढा यांसारख्या अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. धरण 100 टक्के भरल्यानंतर जादा पाणी भीमा नदीपात्रात सोडले जाते. सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबला आहे.
उजनी धरणाची सद्यस्थिती
- धरणात येणारा पाण्याचा विसर्ग: 5226 क्यूसेक
- धरणातून कालव्याद्वारे विसर्ग: 1400 क्यूसेक
- बोगद्याद्वारे विसर्ग: 400 क्यूसेक
- भीमा नदीकडील विसर्ग सध्या बंद करण्यात आला आहे.
advertisement
हे ही वाचा : Poultry Farming: सोन्याची अंडी देतेय गावरान कोंबडी, पुणेकर शेतकऱ्यानं डोकं लावलं, महिन्याची कमाई लाखात!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 06, 2025 2:07 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पाण्याची चिंता मिटली! उजनी धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर; 'या' 4 जिल्ह्यांना मोठा दिलासा








