Skin Care : थंडीत कोरड्या त्वचेसाठी सोपे उपाय, ओठ होतील मऊ, चेहऱ्यावर येईल तेज
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हिवाळ्यात चेहऱ्याची त्वचा बहुतेकदा सर्वात आधी खराब होते. ओठ फुटतात आणि त्यांची चमक पूर्णपणे नाहीशी होते. या सगळ्यावर काही सोपे उपाय पाहूयात.
मुंबई : हिवाळ्याच्या सुरुवातीलाच चेहरा कोरडा, खरखरीत आणि निस्तेज दिसत असेल तर या टिप्स नक्की लक्षात ठेवा. हिवाळ्यात चेहऱ्याची त्वचा बहुतेकदा सर्वात आधी खराब होते. ओठ फुटतात आणि त्यांची चमक पूर्णपणे नाहीशी होते. या सगळ्यावर काही सोपे उपाय पाहूयात.
दूध आणि मध मॉइश्चरायझिंग मास्क - डॉ. सलीम झैदी यांनी याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. दुधात नैसर्गिक चरबी आणि प्रथिनं असतात. त्वचेत खोलवर जाऊन त्वचेचं पोषण करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच, दुधातील लॅक्टिक अॅसिड मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतं. दरम्यान, मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे ज्यामुळे त्वचेची आर्द्रता वाढते. यासाठी एक टेबलस्पून फुल-क्रीम दूध आणि एक टीस्पून मध घ्या. हे मिश्रण एकत्र करा आणि चेहरा, हात आणि पायांना लावा. पंधरा मिनिटांनी कोमट पाण्यानं धुवा. हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे लावू शकता.
advertisement
नारळ तेल - नारळ तेल हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्यातील फॅटी अॅसिड त्वचेवर एक पातळ थर तयार करतात, ज्यामुळे ओलावा टिकून राहतो. आंघोळीनंतर थोडंसं गरम केलेलं कोल्ड प्रेस्ड नारळ तेल संपूर्ण शरीरावर लावा आणि मालिश करा. रात्रभर तसंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गरम पाण्यानं आंघोळ करा. मुरुमं असतील तर हे टाळा.
advertisement
कोरफड आणि ग्लिसरीन - अतिशय कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. दोन चमचे ताजा कोरफडीचा गर आणि एक चमचा ग्लिसरीन घ्या. ते एकत्र करून चेहरा आणि मानेला लावा. वीस मिनिटांनी धुवा.
दुधाची साय - दुधाची साय हिवाळ्यातील त्वचेसाठी एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. यामुळे त्वचा मऊ होते आणि फाटलेले ओठ बरे होतात. चेहऱ्यावर ताजी साय लावा, पाच मिनिटं मसाज करा आणि दहा मिनिटांनी ते धुवा. झोपण्यापूर्वी ओठांना लावा.
advertisement
केळी आणि मधाचा मास्क - केळी आणि मध वापरून मास्क बनवू शकता. हा मास्क त्वचेला त्वरित चमक आणि हायड्रेशन देतो. अर्धं पिकलेले केळं कुस्करा, त्यात एक चमचा मध घाला आणि चेहऱ्याला लावा. पंधरा मिनिटांनी धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करून पाहू शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 8:48 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Skin Care : थंडीत कोरड्या त्वचेसाठी सोपे उपाय, ओठ होतील मऊ, चेहऱ्यावर येईल तेज


